भावा समोरच लहान भावाची चाकूने भोसकून हत्या; मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार

Foto

औरंगाबाद : दारू पिण्यासाठी थंड पाणी लवकर न दिल्याच्या किरकोळ कारणावरून 6 मध्ये मद्यपींच्या टोळक्यांनी भावा समोरच लहान भावावर चाकूने हल्ला करीत हत्या केल्याची घटना सोमवारी मध्यरात्री पुंडलिक नगर भागात घडली.  विशेष म्हणजे 200 फुट आवर्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचार सभा सुरू होती व घटनास्थळी दहा ते बारा पोलिसांच्या समक्ष ही घटना घडली असा आरोप मृताच्या भावाने केला आहे . संपूर्ण आरोपी अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही ही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतल्याने चांगलाच गोंधळ उडाला पोलीस नातेवाईकांची दुपारपर्यंत समजूत काढत होते. 

 दत्तात्रय गंगाराम शेळके 28 वर्ष राहणार पुंडलिक नगर असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.  रविशंकर हरिश्चंद्र तायडे आदिनाथ उर्फ चिकू उत्तम चव्हाण अशी अटक करण्यात आलेल्या दोन्ही मारेकऱ्यांची नावे आहेत.  याप्रकरणी पुंडलिक नगर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, सोमवारी आरोपी तायडे याचा वाढदिवस होता त्यानिमित्ताने आदिनाथ आणि अजून चार मित्र असे सहाजण पार्टी करीत होते. त्यानंतर ते दारू घेण्यासाठी पुंडलिक नगर येथील एका वाईन शॉप वर आले.  तिथून त्यांनी दारू खरेदी केली व दारू पिण्यासाठी शेळके यांच्या चहाच्या टपरीवर ते गेले.  तेथे गर्दी असल्याने पाणी देण्यासाठी शेळके यांना उशीर झाला.  या कारणाने तायडे व त्याचे पाच मित्रांनी शेळके यांच्याशी हुज्जत घालत मारहाण करण्यास सुरुवात केली. शेळके यांनी विरोध केला असता तायडे ने स्वतःच्या कमरेला लावलेला चाकू काढून सपासप वार करण्यास सुरुवात केली.  या हल्ल्यात शेळके जागीच गतप्राण झाले.  यावेळी त्यांचा भाऊ हा तिथेच उभा होता मात्र जोपर्यंत काही समजेल त्या आतच आरोपींनी हत्या करून पळ काढला होता. 

 या प्रकरणी रात्री उशिरा पुंडलिक नगर पोलिसांनी तायडे आणि आजिनाथ या दोन आरोपींना अटक केली आहे चार आरोपी फरार आहेत शेळके यांच्यावर घाटी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येत आहे.  मात्र,  जोपर्यंत इतर चार आरोपी अटक होत नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही.  अशी भूमिका शेळके यांच्या नातेवाईकांनी घेतल्याने घाटीत काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.  पोलिसांनी घाटीत धाव घेत नाशिक नायकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला मात्र दुपारपर्यंत नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला नव्हता.