मुंबई : बांगलादेशात घडलेल्या हिंदूविरोधी घटनांनंतर आणि त्यावरून झालेल्या मोठ्या गदारोळानंतर वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान यांचे नाव सध्या जोरदार चर्चेत आहे. बांगलादेशात घडलेल्या हिंदूविरोधी घटनांनंतर आणि त्यावरून झालेल्या मोठ्या गदारोळानंतर वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान यांचे नाव सध्या जोरदार चर्चेत आहे.
आयपीएल लिलावात कोलकाता नाइट रायडर्स संघाने मुस्तफिजुरला विकत घेतले होते. मात्र, सध्याच्या वादामुळे त्याच्या आयपीएलमधील सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डने या प्रकरणावरून केकेआर व्यवस्थापनाशी चर्चा केली असून, मुस्तफिजुरच्या जागी दुसर्या खेळाडूचा विचार करण्याचा सल्ला दिला आहे.
मुस्तफिजुरच्या निवडीवर देशभरात तीव्र विरोध झाला असून, केकेआरलाही मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले आहे. या सगळ्या घडामोडींमुळे केकेआर व्यवस्थापनाची अवस्था सध्या चांगलीच कोंडीत सापडली आहे.
या प्रकरणात केकेआरचे मालक शाहरुख खान यांनाही टीकेचा सामना करावा लागला आहे. मुस्तफिजुरला संघात घेतल्यामुळे अनेकांनी शाहरुख खान यांच्यावरही थेट निशाणा साधला होता.
अखिल भारतीय हिंदू महासभा आग्रा जिल्हा अध्यक्षा मीरा राठोड म्हटले होते की, जो कोणी शाहरुख खानची जीभ छाटेल, त्याला आम्ही १,००,००० चे रोख बक्षीस देऊ....आयपीएलच्या इतिहासात एखाद्या खेळाडूभोवती राजकीय किंवा सामाजिक वाद निर्माण होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेकदा क्रिकेट आणि राजकारण यांचा संघर्ष समोर आला आहे.
आयपीएलच्या इतिहासात एखाद्या खेळाडूभोवती राजकीय किंवा सामाजिक वाद निर्माण होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेकदा क्रिकेट आणि राजकारण यांचा संघर्ष समोर आला आहे. यावेळीही खेळाशी संबंधित निर्णय सामाजिक घडामोडींशी जोडून पाहिले जात असून, त्यामुळे लीगची निष्पक्षता आणि खेळाडूंच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.