पंतप्रधानांनी मौन सोडले, दिला कठोर करवाईचा इशारा चर्चा नको, राजीनामा हवाय...आंदोलक आणि राहुल गांधी आपल्या मागण्यांवर ठाम

Foto
नवी दिल्ली : देशातील विविध परीक्षांच्या पेपर लीक प्रकरणांवरून, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यासह पोरीबाळींवर केलेल्या अमानुष अत्याचारानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटच्या माध्यमातून मौन सोडत प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान मोदी यांनी पेपर लीक प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी चर्चा नको धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या या मागणवर ठाम असल्याचे म्हटले आहे.
 
आज सकाळीच ट्वीट करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, देशातील विद्यार्थ्यांचं हित आणि भविष्याला सर्वोच्च प्राधान्य असल्याचं सांगत पेपरफुटी  प्रकरण मोठे आदेश दिले आहेत. नीट पेपर लीक आणि  दिल्लीत सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर  एक्सवर  केलेल्या पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, देशातील तरुणांचं हित आणि त्यांचं भविष्य याला आमचं सर्वोच्च प्राधान्य आहे. पेपरफुटी प्रकरणातील सर्व दोषींना लवकरात लवकर कठोर शिक्षा सुनावण्यासाठी आणि खटल्याची त्वरित सुनावणी व्हावी यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना केली जाईल. तसेच या संदर्भात आवश्यक ती पावले उचलण्यात यावीत, असे आदेश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांचं हित सुरक्षित करण्यासाठी सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयांच्या साखळीमधील हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी  या पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणार्‍या कुठल्याही व्यक्तीला सोडलं जाणार  नाही, असा इशाराही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.

राहुल गांधी यांच्या तीन मागण्या 
दरम्यान पंतप्रधान मोदींच्या या दाव्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तीव्र शब्दांत समाचार घे, तुम्हीच आपल्या देशातील तरुणांच्या भविष्याचे सर्वाधिक नुकसान केले आहे, असा रोखठोक आरोप केला आहे आपल्या ट्वीटमध्य राहुल गांधी यांनी केंद्र सरकारसमोर तीन प्रमुख मागण्या मांडल्या आहेत: यामध्ये केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची तात्काळ हकालपट्टी करावी, पंतप्रधान आणि सरकारने देशातील विद्यार्थ्यांची जाहीर माफी मागावी, आंदोलक विद्यार्थ्यांवर हिंसाचार करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागण्यांचा समावेश आहे. 

अभिजीत दिपके यांचे म्हणणे काय ? 
तर अभिजित दिपकेंनी  पंतप्रधानांच्या एक्स पोस्टला शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा फोटो शेयर करत       असे म्हणत खोचक टोला लगावला आहे. दुसरीकडे आम्ही आमच्या मागणीवर ठाम असून आंदोलकांशी जी काही चर्चा करायची असेल ती त्यांनी जंतरमंतरवर येऊन करावी आम्ही सरकारकडे जाणार नाही अशी भूमिका सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष रांका यांनी घेतली आहे. 

भाजप गुंड पाठवून आंदोलकांना चिथावणी देत आहे
पुढे बोलताना अभिजित दीपके म्हणाले कि, भाजप गुंड पाठवून आंदोलकांना चिथावणी देत आहे. आंदोलनात मुद्दाम अडथळा आणण्यासाठी बाहेरून लोकांना पाठवले जात आहे. आम्ही महिनाभर इथे बसलो आहोत. महिनाभरात अशी कोणतीही घटना घडली नाही, पण आता आंदोलन तीव्र झाल्याने भाजप बाहेरून गुंड पाठवून मुद्दाम लोकांना चिथावणी देत आहे. भाजपचेच लोक दगडफेक करत आहेत. पोलीस इथे दगडांनी भरलेले ट्रक आणतात. भाजपचे गुंड येतात, दगडफेक करतात आणि मग सरन्यायाधीशांची बदनामी करतात. असेही ते म्हणाले.