आद्य क्रांतिगुरू लहुजी साळवे यांची जयंती उत्साहात

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकात
आद्य क्रांतिगुरू लहुजी साळवे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी माजी मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती. आ. अब्दुल 
सत्तार यांच्या हस्ते क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. 
आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात दिलेले योगदान, त्यांचे देशप्रेम, शौर्य, सामाजिक समता आणि राष्ट्रसेवेचे विचार आजही समाजाला प्रेरणा देणारे आहेत. अन्यायाविरुद्ध लढण्याची वृत्ती, वंचित घटकांना संघटित करण्याचे कार्य आणि राष्ट्रभक्तीचा विचार पुढील पिढ्यांसाठी सदैव मार्गदर्शक राहील, असे यावेळी आ. सत्तार म्हणाले. 

उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सतीश ताठे, नॅशनल सहकारी सूतगिरणीचे संचालक सयाजीराव वाघ, अशोक बनसोड, सद्दाम पटेल, जगन्नाथ कुदळ, युवासेनेचे शिवा टोम्पे, फहीम पठाण, संतोष लहाने, राजेंद्र साठे, हरी घुगरे, अशोक कांबळे, साहेबराव सोनवणे, नानासाहेब गायकवाड, साहेबराव आहीरे, सुखदेव कांबळे, किसन सौदागर, किशोर भिसे, विष्णु साळवे, मनोज आहीरे, राजु कांबळे, संजय कांबळे, संजय मोरे, दिपक कांबळे, राजेंद्र गोफणे, सागर खेत्रे, स्वप्नील सौदागर, रोहन सोनवणे, शिवदास दनके आदींची उपस्थिती होती.