पुनर्निरीक्षण प्रक्रियेच्या विलंबाची चौकशी करून कारवाई करावी

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी): सिल्लोड सोयगाव मतदार संघ १०४ मध्ये विषय पुनर्रनिरीक्षण विलंब अनियमितता व राजकीय हस्तक्षेप याबाबत सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षातर्फे करण्यात आले आहे.

याबाबत तहसीलदार सिल्लोड यांना भाजपतर्फे निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, सिल्लोड सोयगाव मतदार मतदारसंघातील याद्यांच्या प्राथमिक पडताळणीमध्ये गंभीर स्वरूपाच्या अनियमिता निदर्शनास आले आहेत. उपलब्ध माहितीनुसार जालना, बुलढाणा, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मतदारांची नावे त्यांच्या मूळ मतदार संघात असतानांही सदर नावे सिल्लोड मतदारसंघांमध्ये सामवीष्ट करण्यात आलेली आहे. एकाच व्यक्तीची नावे एक किंवा १९५० मधील तरतुदीनुसार प्रतिकूल आहे.

 मतदारसंघांमध्ये नोंद झालेली असून ही बाब मधील तर त्यांना प्रतिकूल आहे. तसेच सिल्लोड शहरांमध्ये अंदाजे तीन हजार पाचशे व संपूर्ण तालुक्यात सुमारे १२००० इतका मयत मतदार असताना अशा मतांची नावे याद्यांमध्ये कायम असल्याचे निदर्शनास आले. याशिवाय विवाह झालेल्या महिलांची नावे माहेर व सासर अशा दोन्ही ठिकाणी महाराष्ट्र शासन  तहसिलदार  नोंदवलेल्या असल्याची मोठ्या प्रमाणात आढळून येते तसेच परदेशी नागरिक बांगलादेशी रोहिय्या यांची नावे सामाविष्ट आहे.

 ही अत्यंत गंभीर चिंताजनक बाब आहे. उपलब्ध प्राथमिक माहितीनुसार सिल्लोड सोयगाव तालुक्यात ही बाब लोकशाही व्यवस्थेला मूलभूत तत्त्वांना बाधा आणणारी आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष पुनर्रक्षण प्रक्रियेमध्ये संबंधित बिएलओ मार्फत जाणीवपूर्वक हलगर्जीपणा होत असल्याचे दिसुन येते. स्थानिक आमदार अब्दुल सत्तार अब्दुल नबी यांच्या प्रभाखाली व हसताक्षेप होत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यांच्या खाजगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक तसेच नगरपरिषद येथील अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष पडताळणीमध्ये हस्तक्षेप करीत आहे.

काही प्रकरणांमध्ये बिएलओ ची मोबाईल इतर ऐउपकरणे देखील येथे मार्फत वापरले जात असल्याचे समजते परिणामी सिल्लोड शहरांमध्ये केवळ सुमारे १५% तर ग्रामीण भागात ५० टक्के इतके काम पूर्ण झाले असून जाणीव पूर्वक या कामात विलंब व निष्क्रियता दिसून येत आहे राजकीय हस्तक्षेपामुळे दुबार व बोगस मतदार नावं वगळण्यात येऊ नये असा प्रयत्न होत आहे असे नमूद करण्यात आले आहे. या निवेदनावर भाजप सिल्लोड मंडळ अध्यक्ष मनोज मोरेल्लू, किसान मोर्चा चे प्रदेश सरचिटणीस मकरंद कोर्डे, कमलेश कटारिया, नगरसेवक गणेश भुमकर, शामराव आळणे, मोतीराम मिसाळ, योगेश साळवे, अमोल कुलकर्णी, वशिम बागवान, आदी पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.