राज्यपाल नियुक्‍त सदस्य निवडीचा तिढा सुटला

Foto
महाराष्ट्रातील विधान परिषदेवरील राज्यपाल निर्देशित सदस्यांच्या 12 जागा रिकाम्या आहेत. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून याबद्दल कोणताही निर्णय झाला नाही. अखेर या मुद्दावर महाविकास आघाडी सरकारने तोडगा काढला आहे.  12 सदस्यांची नावे आज मंत्रिमंडळासमोर ठेवली जाणार आहे.  विधान परिषदेवर कुणाला पाठवायचा असा मोठा प्रश्न उपस्थितीत झाला होता.  गेल्या सहा महिन्यांपासून राज्यपाल नियुक्त आमदारांचा तिढा कायम होता. अखेर या नावावर आता शिक्कामोर्तब झाल्याचे कळत आहे. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही नावे ठेवण्यात येण्याची शक्यता आहे.