लोक वाद्यवृंदने महोत्सवाचा समारोप युवक महोत्सवात रसिकही थिरकले...

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : जिल्हास्तरीय युवक महोत्सवात शेवटचा कलाप्रकार लोक वाद्यवृंद ठरले. एकूण सहा संघांनी यात सहभाग घेतला. मंचावर सादर झालेल्या या कलाप्रकारास दाद देतांना रसिकही थिरकले.
शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयात आयोजीत जिल्हा युवा महोत्सवात सकाळच्या सत्रात भारतीय लोक-आदिवासी नृत्य या सांघिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा सृजनरंग अर्थात वंदे मातरम सभागृहात पार पडली. या कलाप्रकारात १४ संघांनी आपला नृत्याविष्कार मंचावर सादर केला. कलाप्रकारात प्रामुख्याने राजस्थानी लोकनृत्य, बंजारा नृत्य, देवीचा गोंधळ, कोळी नृत्य, जागरण गोंधळ, आणि वारकरी दिंडी नृत्य यांसारख्या पारंपरिक कलांचे सादरीकरण करण्यात आले. यासोबतच, कर्नाटकातील तुळूनाडू प्रदेशातील भूतकला या धार्मिक कलाप्रकाराचेही प्रभावी सादरीकरण मंचावर झाले.
नोक / आदिवाली नृत्य । लोद रंग
वापरण्यात नृत्य सादरीकरणामध्ये आलेली पारंपरिक वेशभूषा, आकर्षक अलंकार, सुमधुर संगीत आणि तालवाद्यांचा प्रभावी वापर यामुळे वातावरण भारावून गेले होते. मुख्य रंगमंचावर दुपारच्या सत्रात लोक वाद्यवृंद हा कला प्रकार सादर झाला. यावेळी कुलगुरू डॉ. विजय फुलारी, प्राचार्य डॉ. वैशाली देशमुख, डॉ. दिलीप महालिंगे, डॉ विट्ठल मोरे, शैलेश बनसोडे, प्रा. समाधान सातव आदी उपस्थित होते.
छत्रपती संभाजीनगर
त्सव-२०२०
नकला)। वाद्यवृंद । स
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions