राज्यात ‘मुका घ्या मुका’ सिनेमा चालू आहे; संजय राऊतांचा खोचक टोला

Fotoमुंबई : माजी नगरसेविका शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकास सुर्वे व्हायरल व्हिडीओ प्रकरणात पोलिसांकडून धरपकड सुरू असून यावर आता संजय राऊतांनी आपली तिखट प्रतिक्रिया दिली आहे. देशातील विरोधी पक्षातील नेत्यांवर होत असलेल्या अन्यायाचा पाढा वाचत संजय राऊतांनी शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडीओवर भाष्य केले.


आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊतांनी ठाकरे गटाला टार्गेट करण्याचं राजकारण सुरू असल्याचं सांगितलं. यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, “जगातील १०० शक्तिशाली युवकांमध्ये बाळासाहेब ठाकरेंचे नातू आदित्य ठाकरेंचा यांचा समावेश होणं हा महाराष्ट्रासह देशाचाही गौरव आहे. एकीकडे देशाला ऑस्कर मिळाला आणि दुसरीकडे आदित्य ठाकरेंची १०० शक्तिशाली युवकांमध्ये समावेश झाला. यासाठी आम्ही सगळे आनंदी आहोत.”


तुमचे हे हल्ले आम्ही परतवून लावू
तसंच गेल्या काही महिन्यापासून ठाकरे कुटूंब आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना टार्गेट करण्याचं राजकारण सुरूय. या एकमेव हेतूने देशाचं राजकारण सुरूय. मग तो संपत्तीचा विषय असो किंवा मग व्हिडीओ मॉर्फिंगचा असो. पण या देशातील न्यायव्यवस्था अजुनही जिवंत आहे. त्यामुळे आम्हाला न्यायव्यवस्थेकडून आशेचे किरण दिसतात. महाराष्ट्रात खोकेवाल्यांचं सरकार आहे. या खोकेवाल्यांकडून हिशोब मागायला हवं. पण ते आमचा हिशोब मागत आहेत. तुम्ही असे कायदेशीर आणि बेकायदेशीर हल्ले कितीही करा, तुमचे हे हल्ले आम्ही परतवून लावू.”, असा इशारा देखील यावेळी संजय राऊतांनी दिला.

शिवसेनेला टार्गेट करू नका
शीतल म्हात्रे व्हिडीओ प्रकरणावर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले की, “मुंबईत सध्या मुका घ्या मुका सिनेमा सुरू आहे. या व्हिडीओ प्रकरणात ठाकरे गटााच्या कार्यकर्त्यांना का अटक करत आहेत? त्यांचा या प्रकरणाशी संबंध काय आहे? हा सत्तेचा गैरवापर आहे. आम्ही सांगितलं होतं जाहीर कार्यक्रमात मुका घ्यायला. मुळात हा व्हिडीओ खरा की खोटा हे आधी समोर येऊ द्या. हा व्हिडीओ आमदाराच्या मुलाने शेअर केला आहे. त्याला अटक का केली नाही? ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांच्या घरी पोलीस येऊन चौकशी करत आहेत. तुमच्या पक्षातील जर अंतर्गत मतभेद असतील तर तुम्ही मिटवा. शिवसेनेला टार्गेट करू नका.”

सत्तेचा गैरवापर
शीतल म्हात्रे व्हिडीओ प्रकरणावर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले की, “मुंबईत सध्या मुका घ्या मुका सिनेमा सुरू आहे. या व्हिडीओ प्रकरणात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना का अटक करत आहेत? त्यांचा या प्रकरणाशी संबंध काय आहे? हा सत्तेचा गैरवापर आहे. आम्ही सांगितलं होतं जाहीर कार्यक्रमात मुका घ्यायला. मुळात हा व्हिडीओ खरा की खोटा हे आधी समोर येऊ द्या. हा व्हिडीओ आमदाराच्या मुलाने शेअर केला आहे. त्याला अटक का केली नाही? ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांच्या घरी पोलीस येऊन चौकशी करत आहेत. तुमच्या पक्षातील जर अंतर्गत मतभेद असतील तर तुम्ही मिटवा. शिवसेनेला टार्गेट करू नका.” असे म्हटले आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker