वॉशिंग्टन : गेल्या काही दिवसांपासून अमेरिका विरुद्ध इराण सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला झाला असल्याची चर्चा होत असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी हा दावा फेटाळून लावला. गोळीबार झाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी या गोळीबारासंदर्भात सर्व माहिती देण्यात आली. शनिवारी व्हाईट हाऊस करस्पॉन्डंट्स डिनरमध्ये बुलेटप्रूफ जॅकेट घातलेल्या आणि अनेक शस्त्रे बाळगणार्या एका व्यक्तीने सुरक्षा चौकीवर हल्ला केला, ज्यामध्ये एक सुरक्षा अधिकारी जखमी झाला, अशी माहिती राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, व्हाईट हाऊस करस्पॉन्डंट्स डिनरमधील गोळीबारात केवळ एकच हल्लेखोर असावा असे वाटते, तरीही अधिक माहितीसाठी तपास सुरू आहे. त्यांनी पुढे नमूद केले की, संशयिताला सुरक्षा दलांनी पूर्णपणे नियंत्रणात घेतले आहे. ट्रम्प यांनी असेही सांगितले की, या घटनेत एक अधिकारी जखमी झाला आहे, परंतु त्यांची प्रकृती आता ङ्गउत्तमम आहे आणि त्यांना कोणतीही गंभीर इजा झालेली नाही.
नागरिकांनो एकत्र या
डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, गेल्या काही वर्षांत अमेरिकेला हिंसाचार घडवून आणू पाहणार्या व्यक्तींकडून वारंवार धमक्यांचा सामना करावा लागला आहे, त्यामुळे देशाने खंबीर राहणे आवश्यक आहे. ते म्हणाले, गेल्या दोन वर्षांत आपल्या लोकशाहीवर एखाद्या मारेकर्याने हत्येच्या उद्देशाने हल्ला करण्याची ही पहिलीच वेळ नाही.फ या ताज्या घटनेच्या पार्श्वभूमीवर, ट्रम्प यांनी नागरिकांना एकत्र येण्याचे आवाहन केले आणि सर्व अमेरिकन लोकांनी आपापसातील मतभेद शांततेने सोडवण्यासाठी ङ्गमनापासून कटिबद्ध व्हावे, अशी विनंती केली.
पुढील ३० दिवसांत असाच कार्यक्रम घेऊ
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, व्हाईट हाऊस करस्पॉन्डंट्स डिनरमधील गोळीबारातील संशयिताला पकडण्यात आले आहे. अधिकारी आता त्याच्याशी संबंधित ठिकाणांची झडती घेत आहेत, ज्यामध्ये कॅलिफोर्नियातील एका अपार्टमेंटचा समावेश आहे. हल्लेखोराचा एक मानसिक आजारी व्यक्ती असा उल्लेख करत ट्रम्प यांनी असेही सांगितले की, हा कार्यक्रम पुढील ३० दिवसांच्या आत पुन्हा आयोजित केला जाईल आणि तो आधीपेक्षा मोठा, चांगला आणि अधिक सुंदर असेल.
इराणचा संबंध?
या गोळीबाराचा इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षाशी काही संबंध आहे का, असे विचारले असता ट्रम्प यांनी तसे वाटत नाही असे उत्तर दिले. ट्रम्प यांनी हल्लेखोराला लोन वुल्फ(एकटाच हल्ला करणारा) आणि विकृत व्यक्ती असे संबोधले. त्यांच्या मते, ही एखाद्या वेड्या व्यक्तीची कृती असावी, मात्र अधिकारी अद्याप या तपशीलांची माहिती घेत आहेत.
सुरक्षा यंत्रणांचे मानले आभार
कार्यक्रम ज्या हॉटेलमध्ये (वॉशिंग्टन हिल्टन) आयोजित करण्यात आला होता, ती इमारत विशेष सुरक्षित नसल्याचे ट्रम्प म्हणाले. मात्र, ज्या हॉलमध्ये कार्यक्रम सुरू होता, ती जागा अत्यंत सुरक्षित होती आणि त्यामुळे त्यांना अशा प्रकारच्या इनडोअर (बंदिस्त) कार्यक्रमांच्या नियोजनाबद्दल फेरविचार करण्याची गरज वाटत नाही. तुम्ही स्वतः या हल्ल्याचे लक्ष्य होतात का? असे विचारल्यावर त्यांनी कदाचित असावे असे उत्तर दिले. ते पुढे म्हणाले की, जे लोक प्रभावशाली असतात, त्यांनाच लक्ष्य केले जाते.