सोयगाव तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : जिल्ह्यात यंदा पावसाचे वितरण असमान राहिले असून सप्टेंबर महिन्यात पावसाचा वेग मंदावल्याने जिल्ह्यावर कोरड्या दुष्काळाचे सावट घोंगवत असून शेतकऱ्यांमध्ये 'कही खुशी, कही गम' अशी संमिश्र स्थिती निर्माण झाली आहे.
१८ सप्टेंबरपर्यंतच्या नोंदीनुसार, जिल्ह्याची प्रत्यक्ष पाऊस कालावधीची सरासरी ४२२ मिमी इतकी असून, ती अपेक्षित ५२१.५ मिमी सरासरीच्या तुलनेत केवळ ८०.९ टक्के इतकीच पूर्ण झाली आहे. सप्टेंबर महिन्याची प्रत्यक्ष पावसाची सरासरी १०.३ मिमी अपेक्षित असताना प्रत्यक्षात केवळ ३०.३ मिमी (३.६ टक्के) पाऊस नोंदवला गेला आहे, ज्यामुळे सप्टेंबरमध्ये पावसाचा जोर कमी राहिल्याचे स्पष्ट होते.
तालुकानिहाय आकडेवारी
सोयगाव तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक म्हणजेच १०७.६ टक्के पाऊस झाला आहे. सिल्लोड (९६.३%), वैजापूर (९२.१%), फुलंब्री (८९.७%), कन्नड (८५.५%), गंगापूर
शेतकऱ्यांसमोरील अडचणी आणि दुर्घटना
जिल्ह्यात पावसामध्ये मोठी तफावत असल्याने सर्व भागांना समान पाऊस पडला नाही. यामुळे अनेक भागांत अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. एका बाजूला पावसाची तूट आणि मंदावलेला वेग असतानाच, दुसरीकडे जिल्ह्यात झालेल्या अघटित दुर्घटनेने शोककळा पसरली आहे. वीज कोसळून कन्नड व सिल्लोड तालुक्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये पाच जण जागीच मृतमुखी पडले आहेत. यामध्ये दाहिगाव येथील दोन तर पिशोर येथील तीन महिलांचा समावेश आहे. या दुर्दैवी घटनेमुळे मृत पावलेल्या कुटुंबांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी, अशी जोरदार मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.
अन्य तालुक्यांत पावसाची तूट
दमट वातावरणाने नागरिक हैराण
सप्टेंबरमध्येच शहरात ऑक्टोबर हिटचा चटका जाणवू लागला असून गणेशोत्सवाच्या उत्साहात वाढलेल्या उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळी ढगाळ वातावरणामुळे काहीसा दिलासा मिळत असला तरी सूर्य वर येताच उन्हाची तीव्रता वाढत आहे. दमट हवेमुळे दुपारच्या वेळी घामाच्या धारा सुरू असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. गणेशोत्सवामुळे बाजारपेठा, प्रमुख रस्ते आणि मंडळांच्या परिसरात दिवसभर गर्दी असते. त्यातच उन्हाचा तडाखा जाणवत आहे. आगामी काही दिवस कमाल तापमान ३४ ते ३५ अंशांदरम्यान राहण्याचा अंदाज असून, पावसाची शक्यताही कायम आहे.
(८०.९%), पैठण (७२.८%), छत्रपती संभाजीनगर (६९.४%) आणि खुलताबाद (६७.७%) या तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस नोंदवला गेला आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions














