मोशी कचरा डेपो दुर्घटना; आर्थिक मदत देण्याची मागणी
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): लग्नाचे उंबरठे शिवण्यापूर्वीच काळाने घाला घातल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. पुण्याच्या मोशी कचरा डेपोत महानगरपालिकेच्या घनकचऱ्याचा ढिगारा कोसळून बजाजनगर (अयोध्यानगर) येथील ३२ वर्षीय तरुण महेश सुरेश कुंभार याचा जागीच मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना बुधवारी (दि. ८) घडली. रविवारी सकाळी बजाजनगर येथील स्मशानभूमीत त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मूळचे कर्नाटकचे असलेले आणि सध्या बजाजनगर येथे राहणारे कुंभार कुटुंब या घटनेने कोलमडले आहे. घरातील कमावता व कर्ता पुरुष अचानक गेल्याने या कुटुंबावर मोठे संकट कोसळले असून, शासनाने त्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी आणि कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी केली जात आहे.
बजाजनगरात प्राथमिक तर एमबीए पदवी शिक्षण पूर्ण होताच वर्षभरापूर्वीच त्याला पुणे मनपाच्या मोशी येथे एंटोनी लारा रिन्यूएबल एनर्जी प्रा. लि. या कंपनीत नोकरी मिळाली होती. यामुळे कुंभार कुटुंब आनंदात होता. दरम्यान, महेशच्या पार्थिवावर रविवारी सकाळी बजाजनगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
नुकताच झाला होता साखरपुडा
महेश याचा नुकताच साखरपुडा झाला होता. काही दिवसांत लग्न होणार असल्याचे भाऊ व नातेवाईकांनी सांगितले. मात्र पिंपरी चिंचवड येथील मनपाच्या मोशी कचरा डेपो परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. यामुळे कचरा डेपोलगत असलेल्या दुमजली बिल्डींगवर कचऱ्याचा डोंगर कोळसला. यामध्ये कंपनीचे काही अधिकारी व कर्मचारी अडकले. यातील अयोध्यानगर येथील महेश कुंभार याचा या दबून अंत झाला.
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions














