चार महिलांच्या मणिमंगळसूत्रांची चोरी

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेंटर चौक परिसरात गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने चार महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मनीमंगळसूत्र लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एकूण ९१ हजार ४०० रुपयांच्या दागिन्यांची चोरी झाल्याची नोंद करण्यात आली आहे. ही घटना २५ जुलै रोजी दुपारी सुमारे २.३० वाजता पेंटर चौक येथील वैष्णोदेवी मंदिराजवळील गार्डन परिसरात घडली. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा
दाखल करण्यात आला. अंकिता प्रमोद गायकवाड (वय १९, रा. बजाजनगर, छत्रपती संभाजीनगर) यांनी फिर्याद दिली आहे. अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीमध्ये चार महिलांच्या गळ्यातील विविध सोन्याच्या मनीमंगळसूत्रांतील मणी, वाट्या व इतर सोन्याचे भाग असा एकूण ९१ हजार ४०० रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने ही चोरी केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार खिल्लारे करीत आहेत.
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions