आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमधील रानिप, भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी गांधीनगरमध्ये, सपा नेते मुलायमसिंह यादव यांनी मैनपुरी येथे, तर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, केरळचे मुख्यमंत्री पी विजयन, काँग्रेसचे दक्षिण गोवाचे उमेदवार फ्रान्सिस सारधिना, उत्तर गोव्याचे उमेदवार गिरीश चोडणकर यांनी रांगेत उभे राहून मतदान केले. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि त्यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत यांनी कोठंबी या मूळ गावी मतदानाचा हक्क बजावला.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांनी बारामती तालुक्यातील काटेवाडीमध्ये तर कांचन कुल यांनी दौंड तालुक्यातील राहू या गावी, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भोरकदनमध्ये तर पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार गिरीश बापट यांनी पुण्यात सहकुटुंब मतदान केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी सातार्यात तर सांगलीचे
विद्यमान खासदार व भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांनी चिंचणी या मूळ गावी रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजावला.
जळगाव शहरातील मतदान केंद्रावर मनसेचे माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर यांनी मतदान केले.पश्चिम बंगालमधील मालदा येथे ८७ वर्षांच्या आईला मतदानासाठी मुलाने मतदान केंद्रावर उचलून आणले होते.