स्मार्ट बस वर नाहीत ही चित्रे, म्हणून शिवसेना नेत्यातच संभ्रम

Foto

औरंगाबाद - शहरात लवकरच सुरू करण्यात येणारी स्मार्ट सिटी बस तिचा रंग, पूजनाचा मुहूर्त, पद्धत आदी कारणांनी शहरभर चर्चेचा विषय ठरली होती. यात अन्य एका विषयाची भर पडली असून, बसवर असलेल्या डिझाईन मध्ये शहरातील काही लढा, ऐतिहासिक ठिकाणचा समावेश करण्याची मागणी मनपा स्थायी समिती सभापती रेणूकदास वैद्य यांनी शनिवारी दि.15  आयुक्तांकडे केली आहे

 

घृष्णेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज पुरातन वस्तू संग्रहालय, मराठवाडा मुक्तिसंग्राम स्मारक, भद्रामारुती, या चित्रांचा समावेश स्मार्ट बसवर असणाऱ्या चित्रात करण्यात यावा अशी मागणी स्थायी समिती सभापती रेणुकादास वैद्य यांनी आयुक्तांना एका निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. वैद्य यांच्या मते बस वर हि चित्रे विसरली असून दुसऱ्या टप्प्यात येणाऱ्या बस वर ही चित्रे छापून यावीत.

 

काय आहे स्मार्ट बस

स्मार्ट सिटीअंतर्गत केंद्र शासनाने आतापर्यंत महानगरपालिकेला २८३ कोटी रुपयांचा निधी दिलेला आहे. यातून सिटी बस सेवा सुरू करण्यासह इतरही विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. १०० बस खरेदीचे काम टाटा कंपनीला देण्यात आले असून, यातील ३० बस डिसेंबर महिन्यातच मिळणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून सिटी बस सुरु करण्यात यावी अशी नागरिकांची मागणी होती. अखेर २३ डिसेंबरचा मुहूर्त साधून सिटी बस सेवा सुरु होणार आहे. शहरात सुरु होणाऱ्या सिटी बस मध्ये हायड्रोलिक दरवाजे, चारही बाजूंना सीसीटीव्ही कॅमेरे अशा सुविधा असणार आहेत. स्मार्ट सिटीअंतर्गत केंद्र शासनाने आतापर्यंत महानगरपालिकेला २८३ कोटी रुपयांचा निधी दिलेला आहे. यातून सिटी बस सेवा सुरू करण्यासह इतरही विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. १०० बस खरेदीचे काम टाटा कंपनीला देण्यात आले असून, यातील ३० बस डिसेंबर महिन्यातच मिळणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून सिटी बस सुरु करण्यात यावी अशी नागरिकांची मागणी होती. अखेर २३ डिसेंबरचा मुहूर्त साधून सिटी बस सेवा सुरु होणार आहे. शहरात सुरु होणाऱ्या सिटी बस मध्ये हायड्रोलिक दरवाजे, चारही बाजूंना सीसीटीव्ही कॅमेरे असून  जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांची चित्र बसच्या बाहेरील बाजूने असणार आहेत.