आठ दुचाकींसह चोरटे गजाआड

Foto
फुलंब्री, (प्रतिनिधी) फुलंब्री, करमाड, चिकलठाणा, हसूल आणि सिडको पोलीस ठाणे हद्दीतुन दुचाकी चोरणाऱ्या तीन चोरट्यांना फुलंब्री पोलिसांनी गजाआड केले. चोरट्यांच्या ताब्यातून आठ दुचाकीं जप्त. केल्या.

योगेश रघुवीर बमनावत (रा. लालवाडी जि. ता. बदनापूर, जालना), कुणाल उर्फ विकी डांगर (रा. सोनपावाडी ता. सिल्लोड) आणि किरण घुसिंगे (रा.अन्वा, ता. भोकरदन) अशी पकण्यात आलेल्या दुचाकीचोरांची नावे आहेत. फुलंब्री येथील एका अर्बन बँकेसमोरुन फिर्यादी भाऊसाहेब संकपाळ यांची युनिकॉन कंपनीची दुचाकी (एमएच २० एफएस ९९७२) २६ डिसेंबर रोजी चोरीस गेली होती. 

याप्रकरणी फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पो. नि. संजय सहाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ सोनवणे, अनिल शिंदे, दिनकर पांढरे, सुवर्णा करताडे यांच्या पथकाने सदरील गुन्ह्याचा तपास लावत वरील तीन आरोपींना ताब्यात घेतले. 

त्यांनी फुलंब्रीतून दोन, करमाडमधून एक, चिकलठाणा, हर्मुल आणि सिडको येथून प्रत्येकी एक आणि इतर ठिकाच्या दोन अशा एकूण ०८ दुचाक्या चोरी केल्याची कबुली दिली. दरम्यान या आठही दुचाक्या पोलिसांनी जप्त केल्या. तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिन्ही आरोपींना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली