छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): चिलखत, वाघनखे, दांडपट्टा, कट्यार, भाले, सांग, माडू, निरनिराळ्या तलवारी, सुरा, करवार, खंजीर, बिचवा, पंचधातूच्या दीड ते दोन हजार किलोंच्या तोफ बघताना शिवकालीन युद्धकला व छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्ध कौशल्याचा अनुभव घेत इतिहासप्रेमी अवाक झाली. शिवाजी महाराज व मावळ्यांच्या अफाट साहसाची साक्ष देणारी ही शस्त्रे बघून शिवरायांच्या बुद्धी युक्तीचा लाग ना पारं.. या गाण्यातल्या ओळी आठवत होत्या.
शहरनामाचा तिसरा हेरिटेज वॉक रविवारी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालयात घेण्यात आला. एमजीएम विद्यापीठाचा इतिहास व पुरातत्व
शहरनामा
विभाग, आख्यान फाऊंडेशन, गरवारे कम्युनिटी सेंटर, रोटरी क्लब ऑफ छत्रपती संभाजीनगर ईस्ट, ऍडगाइड मीडिया प्रा. लि., भारत पर्यटन विभाग व टीम शहरानामा यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. किलेअर्क परिसरातील रंगीन दरवाजा व हिमायत बाग या ऐतिहासिक वास्तूंजवळ असलेल्या या पुराणवस्तू संग्रहालयाचा इतिहास, वैशिष्ट्ये, दुर्मिळ पुरातत्वीय अवशेष व कलावस्तूंची सविस्तर माहिती क्युरेटर स्वप्नील मगर आणि संचालक प्रकाश पुरवार
आणि पुरातत्वविद आशुतोष पाटील यांनी दिली. शिवरायांची युद्धनीती दालनात युद्धात वापरलेल्या वस्तू जसे धोप तलवार, मूल्हेरी तलवार, मेवाडी तलवार, तेगा तलवार, सैफ तलवार, शिरोही तलवार, विविध प्रकारच्या सुरा, करवार, खंजीर , बिचवा, तोफ बघायला मिळाल्या. गरवारे कम्युनिटी सेंटरचे संचालक सुनील सुतवणे व रमाकांत रौतल्ले, प्रा. आशुतोष पाटील, ओम परदेशी, निवृत्ती गजभारे, अधिकारी स्नेहल पाटील व टीम शहरनामा यांनी या हेरिटेज वॉकसाठी परिश्रम घेतले.
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions












