छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या शरीररचनाशास्त्र विभागाने अवयवदान चळवळ सुरू केली. या आवाहन आणि आर्त हाकेला चांगला प्रतिसाद मिळत असून, आठवड्यात तिसरे देहदान मिळाले. शहरातील टाऊन सेंटर, सिडको येथील ९५ - वर्षीय रजनी प्रभाकर अत्रे यांच्या नातेवाईकांनी देहदानाचा निर्णय घेतला.
दि. २४ मे रोजी सिडको येथील टाऊन सेंटर परिसरातील रहिवासी स्व. रजनी प्रभाकर अत्रे (वय ९५ वर्षे) यांच्या पार्थिव देहाचे त्यांच्या नातेवाईकांनी देहदान केले. विशेष म्हणजे, हे देहदान चालू आठवड्यातील 1 तिसरे देहदान ठरले आहे.
र -न
देहदान प्रक्रियेत डॉ. स्वप्ना आंबेकर यांनी नातेवाईकांशी समन्वय साधत आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्या. तसेच शरीररचनाशास्त्र
विभागातील कर्मचारी योगेश गोरपडे यांनी विभागासाठी उपलब्ध असलेली महाविद्यालयाची शववाहिनी मध्यरात्री पार्थिव देह विभागाच्या ताब्यात आणला. वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष अध्ययनासाठी अशा देहदानाचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे अधिष्ठाता डॉ. सुक्रे यांनी नमूद केले. तसेच शरीररचनाशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख प्राध्यापक व अर्चना डॉ. कल्याणकर यांच्या प्रयत्नांमुळे आणि सातत्यपूर्ण जनजागृतीमुळे समाजामध्ये देहदानाविषयी सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होत असून अशा सामाजिक बांधिलकीच्या कार्याला अधिक बळ मिळत आहे. महाविद्यालय प्रशासनातर्फे स्व. रजनी प्रभाकर अत्रे यांच्या कुटुंबीयांचे आभार मानण्यात आले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे वैद्यकीय शिक्षण क्षेत्राला अमूल्य योगदान लाभणार असल्याचे सांगण्यात आले.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions















