तहानलेली गावे वाढली

Foto
टँकरच्या संख्येतही वाढ; दमदार पावसाची प्रतीक्षा कायम

छत्रपती संभाजीनगर, सांजवार्ता ब्यूरो) : निम्मा सप्टेंबर महिना उलटून गेला तरी मराठवाड्यात दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पावसाने मोठा खंड दिल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. आजघडीला छत्रपती संभाजीनगरसह विभागातील चार जिल्ह्यांतील तहानलेल्या १११ गावे आणि ५७ वाड्यांना १९६ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. 

याशिवाय मराठवाड्यात ५०४ विहिरीही अधिग्रहित करण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्तालय प्रशासनातर्फे देण्यात आली, तर उर्वरित चारही जिल्हे टँकरमुक्त आहेत. उन्हाळा सुरू होताच यंदाही मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील तहानलेल्या गावात टप्प्याटप्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला. पावसाळा सुरू झाल्यावर टँकरचा प्रश्न निकाली लागेल, अशी अपेक्षा होती. परंतु सर्वदूर अपेक्षित पाऊस झाला नाही आणि जलस्रोत आटलेल्या गावांची तहान भागविण्यासाठी ग्राम स्थांना जूननंतर देखील टँकरचा आधार घ्यावा लागला.

जून, जुलै महिन्यात यात वाढ झाल्याने एकही जिल्हा टँकरमुक्त नव्हता. विशेष म्हणजे जून अखेर छत्रपती संभाजीनगरातील टँकर बंद करण्यात आले होते. परंतु ग्रामस्थांनी मागणी केल्याने टँकर पुन्हा सुरू करावे लागले. विभागातील तहानलेल्या गावांना १४ जुलैदरम्यान ३०३ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. जुलैच्या शेवटच्या

आठवड्यात परभणी वगळता विभागातील उर्वरित सात जिल्ह्यांतील एकूण २५७ गावे आणि १३० वाड्यांना ४२८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. जुलै महिन्यात झालेल्या पावसानंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात टँकरच्या संख्येत घट झाली होती. परंतु जुलै म हिन्यात काही प्रमाणात दिलासा देणाऱ्या पावसाने अपवाद वगळता परिणामी, पाण्याचा प्रश्न अधिक
तीव्र होत गेल्याचे चित्र आहे.

वाड्यांना ७० टँकरद्वारे तर धाराशिव बीड जिल्ह्यातील २७गावे आणि ३४ जिल्ह्यातील सहा गावांना आठ टँकरद्वारे अशा प्रकारे या चारही जिल्ह्यातील मिळून १११ गावे आणि ५७ वाड्यांना १९६ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तउर्वरित चार जिल्हे सुदैवाने टँकर मुक्त आहेत.

-- असा होतोय टँकर पुरवठा -- 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ६६ गावे आणि १४ वाड्यांना ९६ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. जालना जिल्ह्यातील १२ गावे आणि नऊ वाड्यांना २२ टँकरद्वारे, 

-- ५०४ विहिरींचे अधिग्रहण  -- 

सहा संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन हिंगोली, नांदेड हे दोन जिल्हे वगळून मराठवाड्यातील उर्वरित जिल्ह्यांतील खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. १५ सप्टेंबर अहवालानुसार, एकूण ५०४ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २६, जालना २४, परभणी ५, बीड ४३, लातूर २२३, तर धाराशिव जिल्ह्यातील १८३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.