छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : शहराची तहान भागवणाऱ्या मुख्य जलवाहिनीला लागलेली गळती अखेर २१ तासांच्या अथक परिश्रमानंतर काढण्यात प्रशासनाला यश आले आहे. जायकवाडी येथील स्मशानभूमीजवळ १२०० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला लागलेल्या मोठ्या गळतीमुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. प्रशासनाने केवळ १० तासांचा शटडाऊन घेतला होता, मात्र कामाचे स्वरूप आणि तांत्रिक अडचणींमुळे ही दुरुस्ती तब्बल २१ तासांवर लांबली. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता काम पूर्ण झाल्यानंतर आता पंपिंग सुरू करण्यात आले असून, शनिवारी सकाळपासून शहरवासीयांना दिलासा मिळणार आहे.
जायकवाडीपासून काही अंतरावर १२०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीला गळती लागल्याचे निदर्शनास आल्यानंतर मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने दुरुस्तीसाठी शटडाऊन
फारोळा, जालाननगर येथील कामही उरकले
दोन पंपांद्वारे नक्षत्रवाडीपर्यंत पाणी
▶ दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी जायकवाडी येथील एक पंप सुरू करून फारोळ्यापर्यंत आणि फारोळा येथील एक पंप सुरू करून तिथून पुढे नक्षत्रवाडीपर्यंत जलवाहिनी भरण्यास सुरुवात करण्यात आली शनिवारी सकाळपासून शहराला पाणीपुरवठा करण्यात येईल.
घेण्याचे नियोजन केले. मात्र गुरुवारी रात्री फारोळा पंपगृहाजवळ १२०० मिमीच्या जलवाहिनीला गळती लागल्याने वाहणारे पाणी पंपगृहात शिरले.
महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता वसंत भोये, अतिरिक्त कार्यकारी अभियंता अनिल तनपुरे, उपअभियंता किरण धांडे, उपअभियंता मनोज बावीस्कर यांच्यासह अधिकारी, कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली.
गुरुवारी रात्री आठ ते साडेआठ वाजेदरम्यान फारोळा येथील पंपिंग बंद करून दुरुस्तीचे काम तत्काळ हाती घेण्यात आले. या कामासोबत फारोळा येथील नवीन जलशुद्धीकरण केंद्रातील दुरुस्तीसह शहरातील जालाननगर येथील १४०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीवरील मोठ्या गळतीचीही दुरुस्ती करून घेण्यात आली.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions












