छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : मिटमिटा गावच्या उत्तरेस असलेल्या खबुतरी डोंगर रांगेत डोंगर भ्रमंती करत असताना डोंगर रांगेमध्ये तीस फूट खोल असलेली घळी दिसून आली व त्या ठिकाणी एक लोखंडी नाणेही सापडले.
मिटमिटा येथील सतिष साहेबराव सरोदे, वीटभट्टी मालक सचिन मारोती सोमदे यांनी सदर घळीची माहिती इतिहास अभ्यासक डॉ. शिवाजी गायकवाड यांना दिली. यावेळी प्रत्यक्ष जागेवर पाहून बघितले असता सदर घळी ही अंडरग्राउंड वॉटर सिस्टीमचा एक भाग असू शकते अथवा जमिनीच्या खाली या ठिकाणी मोठे भुयार असण्याची शक्यता वर्तवली आहे.
सदर डोंगराच्या मधोमध असल्यामुळे व वरती कपार असल्यामुळे निश्चितच एक मोठा ऐतिहासिक दस्तऐवज हाती लागण्याची शक्यता वर्तवली आहे. कारण या परिसरामध्ये
दौलताबाद, बीबी का मकबरा, मिटमिटा व छत्रपती संभाजीनगरमधील ऐतिहासिक पानचक्की यासाठी या ठिकाणाहून विविध पाण्याचे स्रोत एकत्र करून पाणचक्की, थत्ते हौद किंवा मिटमिटा येथे असलेली पुरातन कासंबरी दर्गा आहे. या परिसरात अंडरग्राउंड वॉटर सिस्टीम द्वारे पाणी घेऊन जाण्याची व्यवस्था करण्यात आलेली असावी, असे
प्रथमदर्शनी दिसून येते. व्यापारी जमिनीच्या आत ठेवत मौल्वान वस्तू
प्राचीन काळामध्ये वाटसरूच्या मार्गावर नैसर्गिकरित्या पाणी बारव तयार करण्यात येत असे. या बारवांमध्ये आजही उन्हाळ्यातही पाणी दिसून येते. हा ऐतिहासिक वास्तुशास्त्राचा अजोड नमुना तत्कालीन राज्यकर्त्यांनी केलेला असावा असा निष्कर्ष निघतो. दौलताबाद, संभाजीनगर या मार्गावर हे ठिकाण आहे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे हा एक व्यापारी मार्ग होता आणि या मार्गावर व्यापारी जमिनीच्या आत आपल्या मौल्यवान वस्तू ठेवत असावे, असेही प्रथमदर्शनी ज्ञात होत आहे. इतिहास संशोधक डॉ. शिवाजी गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे.














