छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : जिल्हा परिषदेसह खासगी आणि अनुदानित शाळांमधील पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. परीक्षा २० एप्रिल ते २६ एप्रिलदरम्यान पार पडणार असून, त्यानंतर ३० एप्रिलपर्यंत संकलित मूल्यमापन चाचणी घेतली जाणार आहे. यंदा विद्यार्थ्यांना उन्हाळ्याची एकूण ४४ दिवसांची सुटी मिळणार आहे. वाढत्या उन्हामुळे परीक्षा लवकर घेण्याची मागणी दरवर्षी समग्र शिक्षा आणि एससीईआरटीकडून एप्रिलमध्ये गणित व भाषा विषयांची मूल्यमापन चाचणी घेतली जाते. यंदा दहावी-बारावीच्या परीक्षा १५ दिवस आधीच सुरू झाल्याने त्या मार्चच्या दुसर्या आठवड्यात संपणार आहेत. वाढता उन्हाचा तडाखा लक्षात घेता, पहिली ते नववीच्या परीक्षाही लवकर घ्याव्यात, अशी मागणी शिक्षकांकडून होत होती.










