अजितदादांना हा ग्रंथ भेट दिला होता श्रीमद् भागवत वाचल्यास अपघाती मृत्यू होत नाही : डॉ. सूरदासजी

Foto
 मुंबई : इस्कॉन खारघरचे संस्थापक विश्वस्त आणि अध्यक्ष डॉ. सूरदासजी प्रभू यांनी अजित पवार यांच्याबाबत एक वक्तव्य केले आहे. श्रीमद् भागवत ग्रंथाचे नित्य वाचन केल्यास माणसाचा अपघाती मृत्यू ओढवत नाही, असा आपला ठाम विश्वास असल्याचे सांगत, अजित पवारांसोबत घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

डॉ. सूरदासजी यांनी सांगितले की, मागील आषाढी एकादशीच्या निमित्ताने त्यांनी स्वतः अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना श्रीमद् भागवत हा पवित्र ग्रंथ सप्रेम भेट दिला होता. हा ग्रंथ आवर्जून वाचावा अशी विनंती त्यांनी त्यावेळी केली होती. मात्र, व्यस्ततेमुळे किंवा इतर कारणांमुळे अजित पवारांनी तो ग्रंथ वाचला नसावा, असे डॉ. सूरदासजी यांनी म्हटले आहे.

अपघाती मृत्यूवर काय म्हणाले डॉ. सूरदासजी?
माध्यमांशी बोलताना इस्कॉन अध्यक्षांनी आपली श्रद्धा आणि भावना व्यक्त केल्या,  श्रीमद् भागवत ग्रंथात अपार आध्यात्मिक शक्ती असून त्याचे नियमित वाचन करणार्‍या व्यक्तीवर अशी अचानक आणि अपघाती वेळ येत नाही, अशी आपली श्रद्धा असल्याचे त्यांनी नमूद केले. अजित पवारांसारख्या मोठ्या नेतृत्वाचा असा अचानक जाणे ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत दुःखद आणि न भरून निघणारी हानी असल्याचे सांगत त्यांनी तीव्र शोक व्यक्त केला. डॉ. सूरदासजी प्रभू यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय तसेच सामाजिक वर्तुळात नव्या आध्यात्मिक चर्चेला सुरुवात झाली आहे.