हजारो भाविकांनी घेतले भगवान मुनिसुव्रतनाथांचे दर्शन

Foto
पैठण, (प्रतिनिधी) शनि अमावस्येनिमित्त पैठण येथे महामस्तक अभिषेक महोत्सव उत्साहात संपन्न झाले श्री शनिग्रह अरिष्ट निवारक मुनिसुव्रतनाथ भगवान अतिशय क्षेत्र, पैठण येथे शनिअमावास्येनिमित्त आयोजित भव्य महामस्तक अभिषेक महोत्सव अत्यंत भक्तिमय वातावरणात व मोठ्या उत्साहात संपन्न झाला. भारतातील जैन धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या मूलनायक भगवान मुनिसुव्रतनाथ यांच्या महामस्तक अभिषेकासाठी राज्यासह देशभरातून हजारो भाविकांनी उपस्थिती लावली होती.

संपूर्ण कार्यक्रम बुंदेलखंड केसरी आचार्य श्री १०८ सिद्धांतसागरजी महाराज व प्रशांतमूर्ती आचार्य श्री १०८ गुनभद्रनंदीजी महाराज ससंघ यांच्या पावन सान्निध्यात तसेच अंतर्मना आचार्य श्री १०८ प्रसन्नसागरजी महाराज यांच्या मंगल आशीर्वादाने पार पडला. सकाळी भगवान मुनिसुव्रतनाथ विधान, धर्मध्वजारोहण व महामस्तक अभिषेक विधी मोठ्या भक्तिभावात संपन्न झाला. जयघोष, मंत्रोच्चार आणि भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण तीर्थक्षेत्र मंगलमय झाले होते. यावेळी सौधर्म इंद्र इंद्राणी होण्याचा मान प्रतिभा दिपक स्वयंम प्रियंका सौरभ रति जित ओमांश विवान अजमेरा परिवार यांना मिळाला. तर शांतीधारेचा मान देवेंद्र दिपेश जैन दिल्ली यांना मिळाला. जल अभिषेकाचे सौभाग्य रुपिन आयुष
जैन उत्तराखंड यांना मिळाला. तसेच जयेश काला सी.ए. मुंबई यांना अभिषेकाचा मान मिळाला. नारळ रसाचे सौभाग्य संदिप शितल धनशेटटी इंटी कर्नाटक यांना मिळाला.

 इक्शुरसाचे सौभाग्य सचिन किशन जैन मुंबई यांना मिळाला. आम्रररस निलम किर्ती अजमेरा परिवार यांना मिळाला. मोसंबी रस श्रेयांस विजयकुमार जैन मुंबई यांना मिळाला. ध्रुत अभिषेक देवांश भौतिक अभिषेक सागर शाह यांना मिळाला. दुग्ध अभिषेक रजत महेंद्र ठोले यांना मिळाला. दहि
अभिषेक सुमित किशोर गंगवाल यांना मिळाला. सर्व औषधी विजय वर्धमान सावळे पुणे यांना मिळाला. प्रथम कळस निधी शाह सोलापुर यांना मिळाला. दूसरा कळस सुनिल पन्नालाल गोधा, तिसरा कळस धरमचंद जैन चतुर्थ कळस नरेश डोसी सुरत यांना मिळाला. चंदनलेपन राजेश पाटणी हैद्राबाद यांना मिळाला, पुष्पवृष्टी मनोज चौधरी हैद्राबाद यांना मिळाला तर मंगल आरती राकेश जैन हैद्राबाद यांना मिळाला. पूर्ण कळस देवेंद्र दिपेश जैन चंद्रशेखर कासलीवाल यांना मिळाला. यावेळी सुत्रसंचालन श्रेत्राचे महामंत्री विलास पहाडे यांनी केले.

यानंतर आयोजित धर्मसभेत आचार्य श्री १०८ सिद्धांतसागरजी महाराज यांनी आपल्या प्रवचनात सांगितले की, मनुष्य जीवन हे धर्म, संयम आणि साधनेसाठी मिळालेले अमूल्य वरदान आहे. आजचा माणूस बाह्य सुखाच्या मागे धावत असताना आत्मशांतीपासून दूर जात आहे. भगवान मुनिसुव्रतनाथांच्या जीवनातून संयम, क्षमा आणि त्याग यांचा आदर्श घ्यावा. ग्रहदोषापेक्षा कर्मदोष मोठा असतो आणि चांगल्या कमौनीच जीवन मंगलमय होते. प्रशांतमूर्ती आचार्य श्री १०८ गुनभद्रनंदीजी महाराज यांनी आपल्या प्रवचनात सांगितले की, महामस्तक अभिषेक म्हणजे केवळ भगवानांवर जलाभिषेक नव्हे, तर आपल्या अंत:करणातील  राग-द्वोष धुऊन टाकण्याची साधना आहे. धर्म, अहिंसा आणि
सदाचार यांच्या मार्गावर चालल्यास जीवनात खरे सुख प्राप्त होते. 

या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून देवेंद्र स्नेहदेवी सूरजमल दिल्ली, अमित बडजाते, निलम अजमेरा, रतनलाल पहाडिया, विनय सुरथेधाने, अशोक जैन व मनोज चौधरी उपस्थित होते. महोत्सवानिमित्त हजारो भाविकांसाठी प्रतिभा, स्वयं, प्रियंका, सौरभ, इति, जीत, ओमाश, विवान सिद्धीत अजमेरा परिवार, धाराशिव यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रभावी मंच संचालन बोलीसम्राट प्रविण लोहाडे यांनी केले. 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष महावीर बडजाते, महामंत्री विलास पहाडे, कोषाध्यक्ष विजय पापडीवाल, विश्वस्त जयकुमार बाकलीवाल, प्रमोद कासलीवाल, मनोज काला, प्रकाश कासलीवाल, कैलास पाटणी, किशोर भाकरे, सुमीत गंगवाल, डॉ. संजय गंगवाल, डॉ. राजेंद्र काला, स्वदेश पांडे, अभिजीत काला यांच्यासह विश्वस्त मंडळाने परिश्रम घेतले.
या महोत्सवासाठी छत्रपती संभाजीनगर, हैदराबाद, मुंबई, पुणे, नाशिक, जयपूर, राजस्थान, दिल्ली आदी ठिकाणांहून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते, अशी माहिती प्रचार-प्रसार संयोजक नरेंद्र अजमेरा व पियुष कासलीवाल यांनी दिली.