छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): साताऱ्यातील गर्भपाताचा अड्डा मागील दीड वर्षापासून सुरु असल्याची खळबळजनक माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. दरम्यान, अटकेतील बीएएमएस डॉक्टर, नर्स आणि तिच्या बहिणीला न्यायालयाने सोमवारी (दि. ६) सात दिवसांची (१३ एप्रिलपर्यंत) पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, यातील मास्टरमाइंड नर्स ज्योती पवार आणि डॉ. राजपूत हे दुसऱ्या दिवशीही फरारच असल्याचे समोर आले.
डॉ. विकास मिठाराम आहेर (३२, रा. निल्लोड, ता. सिल्लोड), नर्स वर्षा बाबासाहेब जाधव (३०), उज्वला विठ्ठल गायकवाड (३५, दोघी रा. साईनगर, जि.प.
शाळेजवळ, सातारा) अशी कोठडीतील आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. सुनील पाटील यांनी फिर्याद दाखल केली आहे. सातारा येथील वर्षा आणि उज्जवलाची आई छाया जाधव हिच्या घरात सिल्लोड
आणि आरोपींचे चेहरे पडले...
तालुक्यातील २३ वर्षीय महिलेचा गर्भपात केला जात असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांना मिळाली होती. त्यावरून रविवारी रात्री मनपा आरोग्य आणि सातारा पोलीस पथकाने एकत्रित छापा मारून या अड्डयाचा पर्दाफाश केला होता.
या प्रकरणात दाखल केलेला गुन्हा हा दहा वर्षे ते जन्मठेपेच्या शिक्षेचा असल्याची माहिती सरकारी वकील सविता हिवराळे यांनी न्यायालयात दिली. हे ऐकल्यानंतर आरोपींचे चेहरे पडले. जेव्हा त्यांच्या वकिलांनी या आरोपींच्या पोलीस कोठडीची गरज नाही, असे सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना काहीसे हायसे वाटले होते. मात्र, दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर न्या. ए. व्ही. मुसळे यानी आरोपींना १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली तेव्हा पुन्हा त्यांच्या कपाळावर आठ्या पडल्या.