छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : नापिकी आणि आर्थिक विवंचनेतून तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या करत जीवन संपविले. छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात या घटना घडल्या.
नापिकी आणि कर्जाच्या विवंचनेतून ४० वर्षीय रामकृष्ण शंकर वाघचौरे यांनी विष प्राशन करून जीवनयात्रा संपविली. कन्नड तालुक्यात धनगरवाडी येथे २२ सप्टेंबर रोजी रात्री ही घटना घडली. वाघचौरे यांची औराळा शिवारात पाच एकर शेती कपाशी व तुरीची लागवड केली होती.
मात्र, पेरणीनंतर तब्बल ५० दिवस पावसाने दडी मारल्याने उभी पिके करपली. त्यामुळे शेतीसाठी घेतलेले कर्ज फेडायचे कसे आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवायचा कसा, या विवंचनेत ते होते. दि.२२ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास त्यांनी राहत्या घरी विष प्राशन केले.
नापिकी व आर्थिक विवेचनेतून परंडा शहरातील समाधान उद्धव थोरबोले (३२) या अल्पभूधारक शेतकऱ्याने मंगळवारी (दि.२२) सकाळी ६ वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पाऊस नाही, पिकांना पाणी नाही, उडीद, मका हे पीक वाळून गेले. शेतातील सततचे अपयश, नापिकी व बिकट आर्थिक स्थिती यामुळे समाधान मानसिक तणावाखाली होता. यातूनच त्याने आत्महत्या केल्याचे कुटुंबियांनी सांगितले.
याप्रकरणी परंडा ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. औसा तालुक्यातील वानवडा येथे एका शेतकऱ्याने गळफास घेऊन जीवन संपविले. दत्तात्रय मारुती कदम (४५) असे मृताचे नाव आहे. त्यांनी मंगळवारी (दि.२२) रात्री दहाच्या सुमारास झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. करपलेले गेलेले सोयाबीन पाहून ते नातेवाइकांनी दिली. कदम यांच्या कुटुंबाकडे हताश झाले होते, अशी माहिती त्यांच्या चार एकर कोरडवाहू जमीन आहे.












