कन्नड, (प्रतिनिधी) : शहरातील द्वारकानगरी व समर्थनगर भागात चोरट्यांनी एकाच रात्री तीन रुपयांचा ऐवज लंपास केला.
यात १ लाख ५ हजार रुपयांची रोकड आणि १४ बंद घरे फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह एकूण १५ लाख ६६ हजार २०० लाख ६१ हजारांच्या दागिन्यांचा समावेश असून, या धाडसी चोऱ्यांमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. द्वारकानगरीतील रहिवासी आबासाहेब बारगळ यांच्या बंद घरातून चोरट्यांनी सर्वाधिक १२ लाख ३६ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरला.
त्यानंतर चोरट्यांनी कञ्ड शहर पोलिस ठाण्यातील शिपाई दिनेश खेडकर यांचे घर लक्ष्य करत ७७ हजार ७०० रुपयांच्या मालावर हात साफ केला. तसेच समर्थनगर येथील संगीता चव्हाण यांच्या घरातून २ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला. तिन्ही कुटुंबे बाहेरगावी गेली असताना पहाटेच्या सुमारास ही घटना घडली.
घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी, सहायक फौजदार नासीर पठाण व पथकाने ठसेतज्ज्ञ आणि छत्रपती संभाजीनगर येथील स्वीटी नामक श्वानासह पथकाने घटनास्थळी धाव घेऊन कसून पाहणी केली. मात्र, दशिरापर्यंत तपास यंत्रणेच्या हाती कोणताही ठोस धागादोरा लागला नव्हता.














