छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : शहरातील विविध भागातून चोरट्यांनी तीन दुचाकी लांबविल्याचा प्रकार समोर आला आहे. दुचाकी चोरीप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पहिल्या प्रकरणात महेश हरिभाऊ कोरडे (रा. गादिया विहार रोड) यांची दुचाकी (एमएच २३ व्ही २९६४) गुरुवारी (दि.१९) घरासमोरून चोरट्यांनी लांबविली. त्यांनी शोध घेतला ती सापडली नाही. दुसर्या घटनेत बारी कॉलनीत राहणारे पटेल विखार अहेमद इफतेखार यांची दुचाकी (एमएच २० सीएल ७७२३) सोमवारी (दि.१६) मौलाना आझाद कॉलेजच्या भिंतीलगत उभी केली असता चोरट्यांनी ती चोरून नेली. तिसर्या घटनेत बबन कल्याण पवार (रा. पांढरी तांडा, चित्तेगाव पिंपळगाव) यांची दुचाकी (एम.एच. २० ईडब्ल्यू ४७५१) गुरुवारी बाळापूर फाटा येथील जिजामातनगरातून चोरट्यांनी लांबवल्याचे समोर आले. याप्रकरणी अनुक्रमे जवाहरनगर, सिटी चौक आणि मुकुंदवाडी पोलिसांत गुन्हा नोंद झाला.












