औरंगाबाद- अतिरिक्त पोलिस आयुक्त, चित्रपट दिग्दर्शक आणि निर्मात्यांशी ओळख करुन देत
भंपकबाजी केलेल्या दिल्ली, मुंबईतील भामट्यांनी हज
कमिटीच्या चेअरमन पदाचे आमिष दाखवून बेगमपु-यातील बांधकाम व्यवसायिक
आरेफोद्दीन सिद्दीकी नुरद्दीन
सिद्दीकी (४३ ) यांना ३३ लाखांना गंडवल्याचा प्रकार समोर आला आहे.
विशेष म्हणजे यात दिल्ली दुरदर्शनमध्ये कार्यरत असल्याची बतावणी करुन खालेद
राहगीब (रा. नवी दिल्ली) या भामट्याने गंडवल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यासह
परवेज आलम (रा. शाहीन बाग, ओकला, नवी दिल्ली) आणि आबुसाद (रा. मुंबई) या दोघांचा देखील
समावेश आहे.
हज कमिटीच्या चेअरमनपदाचे आमिष दाखवून गंडवले
आपली महाराष्ट्र सरकारमध्ये चांगली ओळख आहे, त्यामुळे तूम्ही सहजपणे
हज कमिटीचे चेअरमन होवू
शकता असे आमिष दाखवत ३३ लाखांची मागणी आरोपीने केली. त्याप्रमाणे आरेफोद्दीन यांनी पैसे दिले. मात्र पूर्ण पैसे देऊनही नियुक्ती पत्र
देण्यास टाळाटाळ होत होती. त्यामुळे फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्याबरोबर आरेफोद्दीन यांनी आर्थिक गुन्हे शाखा गाठत तक्रार दिली.
पोलिस निरीक्षक श्रीकांत नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस
निरीक्षक अमोल सातोदकर, दत्तु गायकवाड यांनी
चौकशी करुन आरेफोद्दीन यांच्या तक्रारीवरुन बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सातोदकर
करत आहेत.












