वृद्धापकाळ अन् आजारपणामुळे सिद्धार्थ उद्यानातील वाघाचा मृत्यू

Foto
जन्म सिद्धार्थ उद्यानात
'सिद्धार्थ'चा जन्म सिद्धार्थ उद्यान प्राणीसंग्रहालयातच 'गुड्डू' आणि 'दीप्ती' या वाघांच्या जोडीपासून झाला होता. पुढे सिद्धार्थ आणि 'समृद्धी' या जोडीने चार छावांना जन्म दिला. सिद्धार्थ आणि समृद्धी हे दोघेही पर्यटकांचे मुख्य आकर्षण होते. समृद्धीचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे, तर गुरुवारी सिद्धार्थनेही अखेरचा श्वास घेतला. त्याच्या मृत्यूनंतर आता प्राणीसंग्रहालयात चार पिवळे आणि चार पांढरे वाघ शिल्लक राहिले आहेत. शुक्रवारी खडकेश्वर जिल्हा पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने सिद्धार्थचे शवविच्छेदन केले. यानंतर वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि मनपा प्रशासनाच्या उपस्थितीत रीतसर पंचनामा करून सिद्धार्थवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्राणीप्रेमींमध्ये हळहळ
छत्रपती संभाजीनगर, : (सांजवार्ता ब्युरो) महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यान प्राणीसंग्रहालयातील 'सिद्धार्थ' नावाच्या १७ वर्षीय वाघाचा गुरुवारी रात्री ९ वाजता वृद्धापकाळ आणि आजारपणामुळे मृत्यू झाला. त्याच्या निधनाने प्राणीसंग्रहालय प्रशासनासह
प्राणीप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्राणीसंग्रहालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ गेल्या आठ दिवसांपासून बद्धकोष्ठतेच्या समस्येने ग्रस्त होता. प्राणीसंग्रहालयातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीत त्याच्यावर उपचार सुरू
होते. गेल्या काही दिवसांपासून त्याने अन्न पूर्णपणे बंद झाले होते. त्याला सलाईन, आवश्यक अँटीबायोटिक्स आणि टॉनिकचे इंजेक्शन देऊन वाचवण्याचे अथक प्रयत्न करण्यात आले. मात्र, वय जास्त असल्याने उपचारांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions