छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): लाइनची हायड्रॉलिक चाचणी यशस्वी झाल्यानंतर शहरभरातील पाच जलकुंभांमध्ये पाणी साठवून ते वितरित करण्याचा निर्णय गुरुवारी (दि.१३) घेण्यात आला होता. त्यानुसार शुक्रवारी सिडको एन-५ येथील दोन टाक्यांमध्ये पाणी भरण्यात आले. मात्र, प्रयोगशाळा तपासणीत या पाण्यात क्लोरीनची मात्रा आवश्यक प्रमाणापेक्षा कमी असल्याचे स्पष्ट झाले. असुरक्षित व दुषित पाणी पुरवठा टाळण्यासाठी प्रशासन सतर्क झाले असून, पिण्यायोग्य नसल्याने दोन्ही टाक्यांमधील पाणी अखेर सोडून देण्यात आले.
शहराच्या नव्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत नक्षत्रवाडीपासून हसूलपर्यंत जाणारी १,५०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सुरू केली. या जलवाहिनीतून सात जलकुंभांत यशस्वीरीत्या पाणी घेण्यात आले. पण, जलकुंभाला जोडणाऱ्या जलवाहिन्यांची
हायड्रॉलिक चाचणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत पाणीपुरवठा सुरू करू नका, अशी भूमिका महापालिकेने घेतली. या समितीचे पार्श्वभूमीवर गुरुवारी न्यायालयाने नियुक्त केलेल्या अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांच्या उपस्थितीत नक्षत्रवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्रावर बैठक घेण्यात आली.
एन-५ त्यात सिडको येथील दोन व हरसिद्धी, टीव्ही सेंटर, एन-७ येथील टाक्यांना जोडण्यात आलेल्या पाइपलाइनची हायड्रॉलिक चाचणी पूर्ण झाल्यामुळे शुक्रवारी पाणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार सिडको एन-५ येथील दोन टाक्यांमध्ये पाणी घेण्यात आल्याचे अतिरिक्त शहर अभियंता अनिल तनपुरे यांनी सांगितले. टाक्या भरल्यानंतर पाण्याची चाचणी घेण्यात आली, मात्र हे पाणी पिण्यायोग्य नसल्याचे आढळून आले. त्यामुळे दोन्ही टाक्यांमधील पाणी सोडून देण्यात आल्याचे तनपुरे यांनी नमूद केले.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions














