सिल्लोड, (प्रतिनिधी) : तंबाखूमुक्त अभियान निमित्त पंचायत समिती कार्यालय सिल्लोड येथे माननीय गटविकास अधिकारी पंचायत समिती सिल्लोड रत्नाकर पगार यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यालयातील सर्व विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी यांना तंबाखूमुक्त अभियानाची शपथ देण्यात आली.
यावेळी सहाय्यक प्रशासन अधिकारी दिपक गावंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नासेर खान, कृषी अधिकारी सुनील सूर्यवंशी, विस्तार अधिकारी (पंचायत ) साहेबराव शेळके, राधाकिसन चौधरी, विस्तार अधिकारी कृषी जोगेंद्र अहिरराव , राजेंद्र लांडगे, विश्वास बनसोडे, सहाय्यक लेखा अधिकारी उमेश मिसाळ, स्वच्छ भारत मिशन ग्रामीण गट समन्वयक केशवकांत बुलबुले व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.















