पैठण, (प्रतिनिधी) : पैठण एमआयडीसी पोलिसांना दुचाकी वाहने चोरणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात यश आले असून दुचाकी चोरणाऱ्या सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून सहा मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
पोलीस सूत्राकडून मिळालेली माहिती अशी की एमआयडीसीचे पोलीस गुन्हा रेस्ट नंबर ११२/२०२६ कलम ३०३(२) ३, (५) भारतीय न्याय संहिता मधील मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्याचा तपास करीत असताना फिर्यादी पांडुरंग श्रीकिसन वीर राहणार वाहेगाव तालुका पैठण यांची हिरो होंडा स्प्लेंडर प्लस एम एच २० एपी२०५६ ही मोटर सायकल चोरीस गेल्या प्रकरणी सखोल तपास करण्यात आला.
तपासा दरम्यान एमआयडीसी पोलिसांनी ०७ आरोपींना अटक करून त्यांच्या कडून ०६ मोटरसायकली जप्त केल्या. आरोपींची नाव पुढील प्रमाणे आबासाहेब फुलचंद खुणे राहणार टाकळी पैठण, चेतन दत्तात्रय ढगारे राहणार इसरवाडी तालुका पैठण, जीवन सोमनाथ गिन्हे गणेश नगर पिंपळवाडी पैठण, महेश कैलास लहाने राहणार इसवाडी पैठण, सागर मारोती जाधव राहणार गणेश नगर पिंपळवाडी पैठण, समीर आयुब शेख राहणार टाकळी पैठण, शुभम लक्ष्मण गुंड राहणार इसरवाडी पैठण, या कारवाईत सहा मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
हिरो होंडा स्प्लेंडर प्लस एपी२० २०५६, रॉयल एनफिल्ड बुलेट एम एच२०-४४, बजाज प्लेटिना २५ ९०४८, हिरो स्प्लेंडर प्लस-२०--८५११, हिरो स्प्लेंडर प्लस बजाज, तीन लाखाचा मुद्देमाल जप्त पल्सर असा एकूण तीन लाख रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांना त्यांची मोटरसायकल चोरीस गेल्यानंतर परत मिळत नाही, अशी अपेक्षा खूप कमी असते. मोटर सायकल चोरीचा गुन्ह्यांना अत्यंत गांभीर्याने घेऊन अशा प्रत्येक गुन्ह्याचा तपास केवळ चोरी गेलेली वाहने हस्तगत करण्यापुरते मर्यादित न ठेवता त्या मागील संपूर्ण गुन्हेगारी साखळीचा शोध घेऊन संबंधित आरोपी विरुद्ध कायद्यानुसार कठोर व प्रभावी कारवाई करणे तसेच अशा गुन्ह्यांना प्रतिबंध घालणे ही छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांची ठाम भूमिका आहे. या कारवाया मधून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.













