कन्नड, (प्रतिनिधी), : कन्नड पाणपोई पुलाजवळ ट्रॅक्टर आणि कार यांच्यात जोरदार अपघातात कारचे मोठे नुकसान झाले. धडकेनंतर कार अनियंत्रित होऊन बांधकाम सुरू असलेल्या रस्त्याच्या भागात जाऊन धडक होऊन अपघात झाला. या पडली.
सुदैवाने, या अपघातात जीवितहानी किंवा कोणी जखमी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. ट्रॅक्टर पानपोईकडून कन्नडकडे मिळालेल्या माहितीनुसार, एकेरी वाहतुकीचा धोका धडकेनंतर कार बांधकाम सुरू असलेल्या रस्त्यावर कोसळली येत होता, तर कार कन्नडहून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जात होती. याचदरम्यान दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाली. अरुंद रस्ता ठरतोय धोकादायक असून, संबंधित रस्त्यावर बांधकाम सुरू असल्याने वाहतुकीसाठी मर्यादित जागा उपलब्ध आहे.
त्यामुळे वाहनचालकांना अरुंद मार्गावरून एकेरी पद्धतीने वाहने चालवावी लागत आहेत. अशा परिस्थितीत वाहनांची ये-जा करताना अडचणी निर्माण होत असून, अपघाताचा धोका वाढला आहे. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली. बांधकाम सुरू असलेल्या मार्गावर वाहतूक सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य नियोजन, दिशादर्शक फलक आणि बॅरिकेड्स लावण्याची गरज व्यक्त होत आहे. संबंधित यंत्रणेने तातडीने उपाययोजना करून संभाव्य अपघात टाळावेत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.












