पैठण, (प्रतिनिधी) : शेतीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टर सह विविध आधुनिक यंत्राचा वापर करण्यात येत असल्याने बैलांची संख्या घटली आहे. बैलपोळ्याच्या दिवशी पैठण शहरातून फक्त ३२ बैलांची मिरवणूक करण्यात आली असून त्या मध्ये पोलीस पाटलांच्या चार बैलांचा यात समावेश होता.
एकेकाळी बैलपोळ्याच्या दिवशी पैठण शहरातील कहारगल्ली येथील दक्षिणमुखी मारुती मंदिर येथे हजारोच्या संख्येने बैलांना दर्शनासाठी आणले जात होते. दर्शन झाल्यानंतर शहरातील सर्व बैलांची मिरवणूक पोलीस पाटलांच्या बैलांसह बसस्थानक चौक, सराफा बाजार, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे भाजीमार्केट येथील जुन्या वेशीपर्यंत काढली जात होती. परंतु दिवसेंदिवस बैलांची संख्या घटत चालली असल्याने बैलपोळा सण केवळ नावापुरताच राहिला असल्याचेदिसत आहे. यावर्षी केवळ ३२ बैल मिरवणुकीत सहभागी झाल्याचे दिसून आले.
त्यातच पावसाने ओढ दिल्याने निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीचा फटका ग्रामीण अर्थव्यवस्थेला बसला असून, त्याची झळ आता पारंपरिक सणांनाही जाणवू लागली आहे. शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा सण असलेल्या बैलपोळ्यावर यंदा उत्साहाऐवजी उदासीनतेचे वातावरण पाहायला मिळाले आहे.
पिकांचे नुकसान, चारा-पाण्याची टंचाई आणि आर्थिक अडचणी यामुळे बैलांची सजावट व सणाच्या साहित्यावरील खर्चाला शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आळा घातला असल्याचे दिसून आले आहे. बैलपोळा हा शेतकरी आणि त्याच्या बैलांमधील जिव्हाळ्याचे नाते अधोरेखित करणारा महत्त्वाचा सण मानला जातो. या दिवशी बैलांना आंघोळ घालून
सजविले जाते, त्यांची पूजा केली जाते आणि त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो. अनेक गावात पोळ्यानिमित्त मिरवणुका व विविध पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, यंदा दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर या उत्सवाची रंगत फिकी पडली आहे.
पावसाअभावी खरीप पिकांवर संकट आले असून अनेक शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळण्याची शक्यता कमी झाली आहे. दुसरीकडे, जनावरांसाठी हिरवा चारा उपलब्ध नसल्याने चारा विकत घेण्याचा अतिरिक्त आर्थिक भार शेतकऱ्यांवर पडत आहे. पाण्याची टंचाईही गंभीर बनली असून पशुधनाची काळजी घेणे शेतकऱ्यांसाठी 66 बैल आमच्या शेतीचे खरे सोबती आहेत.
मात्र यंदा शेतीच अडचणीत आल्याने पोळ्याचा आनंदही कमी झाला आहे. अशी भावना एका शेतकऱ्याने व्यक्त केली. दुष्काळाच्या संकटामुळे बैलपोळ्याचा उत्साह कमी झाला असला, तरी शेतकऱ्यांच्या मनातील आपल्या पशुधनाविषयीची कृतज्ञता आणि आपुलकी कायम आहे. पावसाने साथ द्यावी, शेती पुन्हा बहरावी आणि पुढील वर्षी पोळा जल्लोषात साजरा करता यावा, अशीच अपेक्षा ग्रामीण भागातून व्यक्त होत आहे.
-- आव्हान ठरत आहे. --
दरवर्षी पोळ्याच्या निमित्ताने बैलांसाठी नवीन झूल, सजावटीचे साहित्य, रंग व इतर वस्तूंची खरेदी केली जाते. यंदा मात्र बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी कमी दिसून आली असून विक्रेत्यांनाही मंदीचा सामना करावा लागला आहे. सण साजरा करण्याची इच्छा असूनही आर्थिक परिस्थितीमुळे खर्चावर मर्यादा आणावी लागत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.














