उज्ज्वला साळुंके
छत्रपती संभाजीनगर: आडत व्यापार्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. आडत व्यापार्यांच्या समस्या सोडविणार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आता व्यापारी संघटना एकवटल्या असून अन्नधान्य व खाद्यान्न वस्तूंवर ५% जीएसटी लागू झालेला आहे व त्याचे राजस्व राज्यशासनाला मिळत आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती कर (सेस) रद्द करावा. अशी मागणी केली जात आहे. त्यासाठी उद्या आडत व्यापार आणि किराणा मार्केट बंद राहणार आहेत.
शासनाचे लक्ष वेधण्यासाठी उद्या शुक्रवारी (दि.५) बंद पुकारण्यात आला आहे. अन्नधान्य व खाद्यान्न वस्तूंवर ५% जीएसटी लागू झालेला आहे व त्याचे राजस्व राज्यशासनाला मिळत आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती कर (सेस) रद्द करावा. तसेच दि. २६ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत झालेल्या चर्चेमध्ये अनिर्णित विषयांवर पुन्हा त्वरीत मिटींग घेऊन निर्णय घेण्यात यावे. तसेच राष्ट्रीय बाजार समिती बाबत शासनाने प्रस्तावित केलेल्या अध्यादेशामधील त्रुटी दूर करण्याबाबत कृती समितीबरोबर त्वरीत चर्चा करण्यात यावी. कृषी उत्पन्न बाजार समिती मधील कायद्यांमधील बदलांबाबत कृती समितीतर्फे यापूर्वी सुचविण्यात आलेल्या बदलांबाबत कृती समिती बरोबर चर्चा करुन निर्णय घ्यावेत, अन्न सुरक्षा व मानदे कायद्यामधील जाचक तरतुदी रद्द कराव्यात. अनुचित कारवाईस प्रतिबंध करावा. यासह यापूर्वी दिलेल्या आश्वसनानुसार कृषी उत्पन्न बाजार समितीचे परवाने ऑनलाईन उपलब्ध करुन द्यावेत. अन्यथा महाराष्ट्रातील व्यापारी परवाने नुतनीकरण करणार नाहीत. प्रमुख विषयावर चर्चा होऊन शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी (दि. ५) आडत व्यापार्यांनी एकमताने बंदचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बाजारपेठ उद्या ठप्प असणार आहे. जवळपास शहरात पाच हजार क्विंटल मक्क्याची आवक होते. ती उद्या ठप्प राहील. तसेच धान्य देखील खरेदी उद्या त्यामुळे करता येणार नाही. केवळ किराणा आणि आडत मार्केट बंद राहणार आहे. इतर मार्केट सुरू राहणार आहे. मात्र आडत व्यापार्यांच्या मागण्या मान्य व्हव्या अशी अपेक्षा जिल्हा व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष लक्ष्मीनारायण राठी यांनी व्यक्त केली आहे.
आडात बाजार उद्या होईल ठप्प: हरिष पवार
बाजार समितीच्या अनेक प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. आडत व्यापारी, किराणा व्यापार करणार्या व्यापारी वर्गाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. व्यापार्यांच्या समस्यांकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्याने विविध प्रश्न निर्माण झाले आहे. समस्यांकडे लक्ष केंद्रित करावे. अशी अपेक्षा आहे. त्यामुळे उद्या बंद पुकारण्यात आला असल्याचे दि औरंगाबाद मर्चन्ट मर्चंटस असोसिएशनचे अध्यक्ष हरिष पवार यांनी सांगितले.
आडत व्यापार्यांचे प्रश्न सोडविणार केव्हा?: प्रफुल मालाणी
आडत व्यापार्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. ते प्रश्न सोडविणार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्या समस्या सोडविणे अपेक्षित आहे. महाराष्ट्रातील आडत व्यापर्यांचा बंदला महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इण्डस्ट्री - एग्रीकल्चर मुंबईचा पाठींबा दिला आहे. असे चेंबरचे उपाध्यक्ष प्रफुल मालानी यांनी दैनिक सांजवार्ताशी बोलताना स्पष्ट केले आहे.