छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : नियमांचे उल्लंघन करून शहरात धावणार्या ३१ पाण्याच्या टँकरवर प्रादेशिक परिवहन विभागाने मंगळवारी (दि.१०) कारवाई केली. या सर्वांना ४ लाख ४६ हजार २५० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
विविध भागांत अशा टँकरची संख्या वाढल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण झाली होती. काही टँकरवर नंबरप्लेट नसल्याचे, तर काहींनी फिटनेस आणि इतर आवश्यक कागदपत्रांशिवाय रस्त्यावर धावत असल्याचे दिसून आले.
वाहनांमध्ये अनधिकृत फेरबदल करून क्षमतेपेक्षा जास्त पाणी वाहतूक केली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
दानवेंची टीका
यावरून विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी टीका केली होती. त्यानंतर आरटीओ प्रशासनाने कारवाई सुरू केली. मंगळवारी जत करण्यात आलेल्या टँकरची आरटीओ कार्यालयासमोर रांग लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. कारवाईची माहिती मिळताच अनेक वाहनमालकांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता कार्यालयात धाव घेतली. मात्र, दंड भरा, फिटनेस तपासणी पूर्ण करा आणि मगच टैंकर प्या, असा ठाम परिक्षा आरटीओने घेतला.
दरम्यान, काही टँकर खासगी मालकीचे असल्याचे आढळले. कारवाईची माहिती मिळताच अनेक नियमबाह्य टैंकर मंगळवारी रस्त्यावरून गायब झाल्याचे दिसून आले. आरटीओकडून ही मोहीम सुरू ठेवण्याचे संकेत देण्यात आले. नियमभंग करणार्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांनी दिला.














