वृक्षदिंडी, घरकुलचा आढावा

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) : पालोद सिल्लोड तालुक्यातील पालोद ग्रामपंचायत कार्यालयात मुख्य कार्यकारी अधिकारी मित्रू आणि गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांच्या नेतृत्वाखाली वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. 

याप्रसंगी सहायक गटविकास अधिकारी आशिष म्हस्के यांच्या हस्ते ग्रामपंचायत परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांना वृक्षसंवर्धनाचे महत्त्व पटवून देत एक झाड, एक जबाबदारी या संकल्पनेनुसार लावलेल्या वक्षांचे संगोपन करण्याचे आवाहन करण्यात आले. 

यानंतर गावात घरकुल योजनेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. संबंधित अधिकाऱ्यांनी घरकुल लाभार्थ्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन सुरू असलेल्या कामांची पाहणी केली व कामे दर्जे दार आणि वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

कार्यक्रमास या कृषी अधिकारी सूर्यवंशी, बनसोड, केंद्रप्रमुख सुरडकर, मुख्याध्यापक सपकाळ, न्याचे ग्रामपंचायत अधिकारी जयदीप सुरुशे यांच्यासह ग्रामस्थ व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.