कर थकविल्याने तीन मालमत्ता सील

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : एस.आय. आर. कामात अडकल्यामुळे झोन कार्यालयांची मालमत्ता कर वसूली काही दिवसांपासून मागे पडली होती. परंतु गुरुवारपासून मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशावरून अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे व उप आयुक्त (कर निर्धारक व संकलक) विकास नवाळे यांच्या सुचनेनुसार सर्व झोन कार्यालयांनी मोठ्या थकबाकीदारांची मालमत्ता जप्त करण्याची कार्यवाही केली. यात झोन १ मधे तीन मालमत्ता सील
करून रु. २.५६ लाख तर झोन २ मधे तीन मालमत्ता सील करून रु.३.०६ लाख रुपये कर
वसूल करण्यात आला. झोन ४ मधे ३ मालमत्ता सील, झोन ६ मधे २ मालमत्ता सील, झोन ७मधे १ मालमत्ता सील तर झोन
९ मधे १ मालमत्ता सील करून रु. २.०१ लाख एवढा कर वसूल करण्यात आला.
महानगरपालिके च्या पथकांनी दिवसभरात जवळपास ४० लाख एवढा मालमत्ता कर वसूल केला. यापुढे दर गुरुवार व शुक्रवारी थकबाकीदार मालमत्ताधारकांवर अशाच प्रकारे जप्तीची कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यामुळे मालमत्ता धारकांनी त्वरित थकित कर भरून अप्रिय कार्यवाही टाळावी, असे आवाहन मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी केले आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions