हजुरी रूपसाई साधराम साहेबजी यांच्यासाठी श्रद्धांजली सभा

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) सिल्लोड शहरातील शास्त्री - कॉलनी परिसरातील झुलेलाल हॉल येथे श्रद्धेय हजुरी रूपसाई साधराम साहेबजी अनंतात विलीन झाल्याबद्दल श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेस आमदार अब्दुल सत्तार यांनी उपस्थित राहून श्रद्धेय साई साधराम साहेबजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली - वाहिली. 

यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांनी श्रद्धेय साई साधराम साहेबजी यांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांच्या मानवता, सद्भावना, समाज एकता आणि जनसेवेच्या कार्याचा उल्लेख केला. संपूर्ण आयुष्य आध्यात्मिक मूल्यांच्या माध्यमातून समाजाला नवी दिशा देणारे साई हे केवळ संत नव्हते, तर लाखो लोकांच्या श्रद्धेचे आणि प्रेरणेचे केंद्र होते,
असे ते म्हणाले. तसेच साई साधराम साहेबजी यांनी समाजामध्ये प्रेम, बंधुभाव आणि एकात्मतेचा संदेश दिला असून त्यांचे कार्य व विचार पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहतील, असेही आमदार सत्तार यांनी नमूद केले. 

या श्रद्धांजली सभेस जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पा. गाढे, जिल्हा परिषद सदस्य देविदास पालोदकर, माजी उपनगराध्यक्ष विनोद मंडलेचा यांच्यासह माधवदास कटारिया, ज्ञानचंद कटारिया, श्यामलाल भोजवानी, कमलाराम फेरवानी, जगदीश मोटवानी, रामशेठ कटारिया, सतीश कावणा, नंदलाल बजाज, अनिल कटारिया, दयानंद कटारिया आदींसह सिंधी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.