सिल्लोड, (प्रतिनिधी) : मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते विश्वनाथ दिनकरराव पाटेकर उर्फ नाना पाटेकर यांच्या निधनाने संपूर्ण कलासृष्टीवर, देशवासीयांवर शोककळा पसरली.
भराडीतील ज्ञानविकास विद्यालयात नाना पाटेकर यांना श्रद्धांजली अर्पण केली. या कार्यक्रमाच्या वेळी अशोक गरुड यांनी नाना पाटेकर यांच्या जीवनप्रवासावर, त्यांच्या अभिनय कारकिर्दीवर आणि सामाजिक कार्यावर प्रकाश टाकताना
व्यक्त केले की, नाना पाटेकर यांनी रंगभूमीपासून अभिनयातून संवेदनशीलता जोपासत एक उत्कृष्ट कलाकार नव्हे, तर एक माणूस म्हणून त्यांनी कार्य केले.
शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी आणि दुष्काळग्रस्त भागांतील शेतकऱ्यांना, आत्महत्याग्रस्थ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी त्यांनी स्थापन केलेल्या नाम फाउंडेशनच्या माध्यमातून उभे केलेले सामाजिक कार्य ऐतिहासिक, नाना पाटेकर यांचे जीवन शिस्त, कठोर परिश्रम, स्पष्टवक्तेपणा आणि समाजाप्रती असणारी जबाबदारी शिकवते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अशा व्यक्तिमत्वाचा आदर्श घेण्याचे आवाहन केले.















