सिल्लोड, (प्रतिनिधी) : क्रांतिकारक लहुजी साळवे यांच्या जयंतीनिमित्त भाजप कार्यालय येथे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. क्रांतिवीर लहुजी साळवे यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढा देण्यासोबतच समाजात स्वातंत्र्य, स्वाभिमान आणि सामाजिक समतेची भावना जागृत करण्यासाठी मोलाचे कार्य केले.
त्यांनी अनेक क्रांतिकारकांना शस्त्रविद्या व युद्धकलेचे प्रशिक्षण देऊन स्वातंत्र्यलढ्यासाठी प्रेरित केले. त्यांचे शौर्य, त्याग आणि देशभक्तीचा वारसा आजही समाजासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या महान कार्याचे स्मरण करून उपस्थितांनी त्यांना अभिवादन केले. भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश बनकर, भाजप शहर मंडळाध्यक्ष मनोज मोरेल्लु, माजी पंचायत समिती सदस्य अनिल खरात, नगरसेवक स्वप्निल शिनगारे, माजी सरपंच कारभारी काटकर, अतुल साळवे, योगेश साळवे, अमोल कुलकर्णी, निखिल गवळी, सुनील कडमीनचे, डॉ. सचिन साबळे, शिवराम कांबळे, सुखदेव कांबळे, शिवदास दनके, त्र्यंबक शेजुळ, संतोष पालोदकर यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधव उपस्थित होते.












