सिल्लोड, (प्रतिनिधी) : भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी हुतात्म्यांनी आपले बलिदान देऊन भारत स्वतंत्र केला. अशा हुतात्म्यांना पंचायत समिती कार्यालय सिल्लोडच्या वतीने आदरांजली देण्यात आली.
तसेच सिल्लोड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांनी हुतात्मा स्मारकास अभिवादन करून, पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहून हुतात्म्यांना वंदन केले. तसेच सर्व विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत वीर हुतात्म्यास शुक्रवारी ३० जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता दोन मिनिट मौन स्तब्धता पाळून आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी गटविकास अधिकारी पंचायत समिती सिल्लोड रत्नाकर पगार, सहाय्यक प्रशासन अधिकारी दीपक गावंदे, बालविकास प्रकल्प अधिकारी सुनीता सनान्से, विस्तार अधिकारी (पंचायत) अण्णासाहेब गाडेकर, विस्तार अधिकारी (सांख्यिकी) केवलसिंग पाटील, स्वच्छ भारत मिशन कक्ष (ग्रामीण) गट समन्वयक केशवकांत बुलबुले तसेच कार्यालयातील सर्व विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.












