कै. खंडेराव पाटील यांच्या ५८ व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

Foto
पैठण, (प्रतिनिधी)   प्रतिष्ठान शिक्षण प्रसारक मंडळाचे आद्य संस्थापक कै.खंडेराव जी शिसोदे पाटील यांच्या ५८व्या स्मृतिदिनानिमित्त संत ज्ञानेश्वर विद्यालय, आपेगाव येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक कल्याण म्हस्के होते.प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्याध्यापक त्रिंबक ढगे तसेच जालिंदर फलके उपस्थित होते.प्रारंभी विद्यार्थिनीने स्वागतगीत सादर केले.त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते कै. खंडेराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 

यावेळी विद्यालयाच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी कै. खंडेराव पाटील यांच्या जीवनकार्याविषयी मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मार्गदर्शनातून खंडेराव पाटील यांच्या शैक्षणिक कार्याचा आणि संस्थेच्या शैक्षणिक योगदानाचा आढावा घेतला.

विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणाबरोबरच शिस्त,स्वावलंबन, वक्तशीरपणा आणि अध्ययनाची सवय अंगीकारावी,असे आवाहन करण्यात आले. विद्यार्थी, शिक्षक आणि पालक हे शिक्षणव्यवस्थेचे महत्त्वाचे घटक असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तिन्ही घटकांचा समन्वय आवश्यक असल्याचे मान्यवरांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कांतीलाल नवथर यांनी केले. मुख्याध्यापक कल्याण म्हस्के, सहशिक्षक प्रवीण पोकळे, विवेक भोसले, गंगाराम शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सहशिक्षक काकासाहेब लिपाने, संभाजी चिरखे, संजय वल्ले, सतीश आंधळे, ज्ञानेश्वर गायके, प्रकाश पाटील, दीपक लसगरे, बोबडे, गुढे तसेच शिक्षकेतर कर्मचारी दादासाहेब सोनवणे, आहेर आणि विद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी - विद्यार्थिनी उपस्थित होते. राष्ट्रगीत व राज्यगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.