नाशिक : नाशिकमधील टीसीएस धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणात मोठी अपडेट हाती आली आहे. या प्रकरणात एमआयएम नेते इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी निदा खानला आश्रय दिल्या प्रकरणी नाशिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. इम्तियाज जलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
टीसीएस लैंगिक छळ धर्मांतर प्रकरणात लैंगिक छळ आणि धर्मांतर प्रकरणातून नव्या घडामोडी समोर येत आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिला आश्रय दिला गेला होता. तिला एमआयएम पक्षाचे नगरसेवक मतीन पटेल यांची आत्तापर्यंत विशेष तपास पथकाने तीन वेळा चौकशी केली होती. या प्रकरणाने माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आता या प्रकरणात त्यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जलील यांच्या विरोधात पुरावे असल्याने पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. नाशिक पोलिसांनी स्थापन केलेल्या एसआयटीच्या माध्यमातून तपास सुरू आहे. एमआयएम नेते इम्तियाज जलील यांना पुढील चौकशीसाठी आणि न्यायालयीन प्रक्रियेसाठी हजर राहावे लागणार आहे. निदा खानला आश्रय दिल्या प्रकरणात इम्तियाज जलिल यांच्या सहभागाबद्दल एसआयटीने न्यायालयाला माहिती दिली.
निदा खानचं एमआयएम कनेक्शन काय?
नाशिकच्या टीसीएस धर्मांतर प्रकरणातील गुन्हा दाखल झाल्यानंतर निदा खान फरार झाली होत. त्यानंतर तिच्यावर छत्रपती संभाजीनगर पोलिसांचं बारीक लक्ष होतं. निदा खान ही छत्रपती संभाजीनगरमध्ये आढळून आली. फरार झाल्यानंतर निदा खान ही तिच्या मावशीच्या संपर्कात होती. तर तिच्या मावशीच्या संपर्कात एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेल होता. मतीन पटेल हा निदा खानची माहिती घेत होता. निदा खान ही गुन्हा दाखल झाल्यानंतर ४० दिवसांपासून फरार होती. त्यानंतर तिला छत्रपती संभाजीनगरच्याा नारेगाव परिसरात अटक करण्यात आली होती. निदा ही नारेगावात आई, वडील, मावशी आणि इतर व्यक्ती आणि ती स्वत: राहत होती. घरात एकूण पाच जण राहत होते.
संजय शिरसाट यांचा मोठा गौप्यस्फोट
दरम्यान एमआयएम नेत्यावर गुन्हा दाखल झाल्यावर पालकमंत्री आणि शिंदे सेना नेते संजय शिरसाट यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी याप्रकरणी जलील यांना तुरूंगात जावे लागेल असे मोठे वक्तव्य केले आहे. निदा खान हिला नाशिकमधून पळवणे, तिला मुंब्र्यात घेऊन जाणे, तिथून तिला छत्रपती संभाजीनगर येथे आणणे आणि जवळपास ३५ दिवस ज्याने मदत केली, तो मुख्य आरोपी, मी आजही तुम्हाला सांगतो की मुख्य आरोपी हे इम्तियाज जलील हेच आहे. मतीन पटेल हा तर केवळ मोहरा होता. इम्तियाज जलील यांनी हे कारस्थान केलेले आहे. म्हणून आज पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आता त्यांना तुरुंगात जावे लागेल ही परिस्थिती आहे, असे पालकमंत्री संजय शिरसाट म्हणाले.
धर्मांतरणासाठी टोळ्या कार्यरत
धर्मांतरणासाठी पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि कोकणातील काही भाग आहे. तिथे या टोळ्या कार्यरत आहेत. सरकारने हा प्रकार गांभीर्याने घेतला आहे. पोलीसही त्यादृष्टीने तपास करत आहेत. इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला ही आजची सर्वात महत्त्वाची बातमी आहे. हा एका दिवसात दाखल गुन्हा नाही. त्यांचे व्हाईस मॅसेज, कॉल सॅम्पल जुळले आहेत. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३५ दिवस ती निदा खान इथं राहत होती. तिची आई, मावशी आणि एकूण पाच दिवस इथं राहत होते. त्यांच्याशी इम्तियाज जलील यांच्या आदेशानुसार संवाद व्हायचा. म्हणून व्हाईस सॅम्पल, आवाजाचा नुमना जुळला. पोलिसांनी अत्यंत बारकाईने अभ्यास केला, त्यांचे मी अभिनंदन करतो, असे शिरसाट म्हणाले. तर याप्रकरणात जलील यांना तुरुंगात जावे लागेल, असा दावाही शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी केला आहे.