जळगाव महामार्गावर ट्रकने पाच वाहनांना दिली धडक; चालक ताब्यात

Foto
फुलंब्री, (प्रतिनिधी) : छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गावर गुरुवारी (ता. १२) दुपारी साडेचारच्या सुमारास भरधाव ट्रकने एकापाठोपाठ पाच चारचाकींना धडक दिली. चौका गावाजवळील म्हसोचा मंदिर परिसरात घडलेल्या या साखळी अपघातात सर्व वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, यात जीवितहानी टळली. याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध फुलंन्नी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

किन्ही (ता. सोयगाव) येथील उपसरपंच सुभाष शेनफाडू बाडेकर (वय ४५) यांनी फुलंब्री पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, ते शासकीय कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे जात होते. तेव्हा चौका गावाच्या पुढे म्हसोबा मंदिराजवळ फुलंब्रीकडून येणाऱ्या ट्रकच्या (एमएच-१६, बोसी ६९७९) चालकाने भरधाव वेगात व निष्काळजीपणे वाहन बालवित प्रथम स्विफ्ट डिझायर कारला (एमएच-४३, बीएफ ०७१२) जोरदार धडक दिली. त्यानंतर बाडेकर यांच्या स्विफ्ट कारला (एमएच ०४, ईके-०४००) पाठीमागून घडक दिली. यात त्यांच्या कारची काच फुटली. 

तसेच पुढील भागाचेही मोठे नुकसान झाले. त्यानंतर ट्रकचालकाने पुढे जात स्विफ्ट कार (एमएच-२०, एफजी-४२१४), इटिंगा (एमएच-१७. बीएल-५०२९) आणि स्कॉर्पिओ कार (एमएच-२०, सीएच १३७६) या वाहनांना धडक दिली. या वाहनांचे दरवाजे, हेडलाइट, बंपर, रेडिएटा, डिझेल टाकीचे पाइप, स्टिअरिंग रॉड असे मोठे नुकसान झाले. 

अपघातानंतर ट्रकचालकाने वाहन न थांबविता पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, बाडेकर व स्कॉर्पिओचालक अर्जुन परसराम राऊत यांनी प्रसंगावधान राखत ट्रकचा पाठलाग करून ट्रक अडविला चालकाचे नाव शाम्मद छगन सय्यद (रा. सौदाळा, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) आहे. या साखळी अपघातामुळे महामार्गावा वाहतूक विस्कळित झालो होतो. याप्रकरणी ट्रकचालकावर फुलंब्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.