ट्रकची स्कूटीला धडक; पत्नी गंभीर तर बाप -लेक जखमी

Foto
वाळूज महानगर, (प्रतिनिधी) : छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या एका वाळूजकडून दाम्पत्याच्या स्कुटीला भरधाव ट्रकने धडक दिली. हा अपघात रविवारी (दि.१९) दुपारी १२:४५ वाजेच्या सुमारास तिरंगा चौकात घडला. 

यामध्ये पत्नी खाली सुमारास पंढरपूरातील कोसळताच पायावरून चाक गेल्याने गंभीर तर पती-चिमुकला किरकोळ जखमी झाला आहे. दरम्यान हा अपघात घडताच वाळूज वाहतूक शाखेच्या पोलिसांनी तत्काळ चालकास ट्रकसह ताब्यात घेतले असून, जखमींना उपचारार्थ घाटीत रवाना करण्यात आले.

अकबर आझम शेख (३२, रा. बाजारगल्ली, वाळूज) हे स्कुटी (एमएच २०, एफके-३९८१) वरुन पत्नी शेख सायमा व ४ वर्षीय मुलासह छत्रपती संभाजीनगरकडे जात होते. दरम्यान त्यांची मोपेड पंढरपूर तिरंगा चौकात येताच भरधाव आलेल्या ट्रक (एमएच-२०, जीझेड-६८८५) चालकाने वाहतूक सिग्नल चुकवण्याच्या नादात स्कुटीला धडक दिली. यात अकबर आलम शेख यांचे नियंत्रण सुटून पत्नी रस्त्यावर कोसळली. 

याचवेळी ट्रकचे चाक पायावरुन गेल्याने ती गंभीर तर् पती व चिमुकला किरकोळ जखमी झाले. दरम्यान, वाहतूक शाखेचे पोनि पवन चौधरी, फौजदार शंकर शिरसाट, पोलीस अंमलदार रवि बिरारे, घाटीत दाखल केले. तर चालकास ट्रकसह शमशू कादरी यांनी जखमींना उपचारार्थ ताब्यात घेऊन, एमआयडीसी वाळूज पोलिसांच्या स्वाधीन केले. अपघातामुळे झालेली वाहतूक कोंडी सुरळीत केली. मात्र याप्रकरणी उशिरापर्यंत कुठलीही नोंद नसल्याचे पोलिसांनी सांगितले.