ट्रकच्या धडकेत पादचारी ठार; देवगाव फाटा येथील घटना

Foto

औरंगाबाद: रस्त्याने पायी जात असलेल्या 32 वर्षीय नागरिकास भरधाव ट्रकने चिरडल्याची घटना देवगाव  येथे सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली.

 संदीप देवराव सोनवणे (वय ३२ वर्ष) रा. मनुर, ता. वैजापूर असे अपघातात ठार झालेल्या पादचारी नागरिकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, संदीप हे वैजापूर औरंगाबाद रोडणे शेतातून घराकडे जात होते. देवगाव फाटा येथे आले असता पाठीमागून आलेल्या भरधाव वेगातील ट्रकने त्यांना चिरडे. ही घटना सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास देवगाव फाटा येथे घडली. ट्रकने चिरडल्याचे पाहताच घटनास्थळी धाव नागरिकांनी  घेतली. संदीप यांना जखमी अवस्थेत येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी संदीप यास तपासून मृत घोषित केले. पोलिसांनी अपघात ग्रस्त ट्रक चालकास ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची नोंद देगाव रंगारी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास जमादार गव्हाणे हे करीत आहेत.