कोची- भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई आणि त्यांच्या सहकारी ६ महीला शबरीमाला मंदिराला भेट देण्यासाठी शुक्रवारी (ता.१६) कोची विमानतळावर सकाळी ४ वाजता दाखल झाल्या होत्या. मात्र, आंदोलकांच्या आक्रमक पावित्र्यामुळे त्यांना विमानतळाच्या बाहेर पडता आले नाही. यामुळे देसाईंचा मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न फसल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
शबरीमाला मंदिरामध्ये मागील अनेक वर्षापासून महिलांना प्रवेश नव्हता.
त्यावर २८
ऑक्टोंबरला सर्वोच्च न्यायालयाने
महिलांना मंदिरात प्रवेश देण्याचा निर्णय दिला आहे. यानंतर तृप्ती देसाई यांनी शबरीमाला मंदीरात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. यासंबंधी
त्यांनी केरळ सरकार आणि पोलीस
महासंचालक यांना पत्र लिहून सुरक्षेची मागणी केली होती. मात्र अतिरिक्त
सुरक्षा पुरवण्याची मागणी केरळ पोलिसांनी नाकारली होता.
महिलांच्या प्रवेशावर मंदीरातील पुजारी आणि काही कट्टर हिंदू धर्मीयांचा विरोध आहे. तसेच
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अनेक संघटनांनी विरोध केला होता. तृप्ती देसाई यांनी महिलांना या मंदिरात प्रवेश
मिळावा म्हणून देशभरात आंदोलन उभे केले होते. मात्र आंदोलकांच्या विरोधामुळे मंदीरात
प्रवेश न करताच देसाईंना माघारी परतावे लागणार आहे.