छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) निदा खानवरील आरोप द्वेषापोटी केले जात आहेत. न्यायालयावर आमचा विश्वास असून न्यायालयात हे आरोप टिकणार नाहीत, अशी टीका एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी शनिवार (दि.९) केली.
नाशिकमधील कथीत बहुराष्ट्रीय कंपनीतील लैंगिक छळ आणि कथित धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगर येथून अटक करण्यात आली. निदा खानला आश्रय दिल्याप्रकरणी एमआयएमचे नगरसेवक मतीन
पटेल यांनाही या प्रकरणात आरोपी करण्यात आले. ते एसआयआरसंबधी आयोजित बैठकीसाठी शहरात आले होते. ओवेसी म्हणाले की, टीसीएसचे स्टेटमेंट आपण पाहिले असेल. निदा खानचा एचआरशी कोणताही संबंध नव्हता. एफआयआर होण्यापूर्वी निदा खानची बदली झाली होती. काही लोक मीडिया ट्रायल करत आहे त्याचा आम्ही निषेध करतो. बुरखा घालणे कधीपासून बेकायदेशीर झाला? आरोप झाले म्हणजे शिक्षा झाली असे होत नाही. एमआयएमला टार्गेट करा, काहीही फरक पडत नाही.
सुशिक्षित मुले-मुलगी टार्गेट
मुस्लिम समाजातील सुशिक्षित मुला-मुलींना त्रास देण्यासाठी हा कट रचला जात आहे. निदा खानला छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांनी आश्रय दिल्यानंतर त्यांच्यावर नाशिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला, याबाबत विचारले असता आजपर्यंत किती आमदार-खासदारांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. निदा खानला एमआयएमच्या नगरसेवकाने लपवले हे कसे समजले? असा सवाल असदुद्दीन ओवैसी यांनी उपस्थित केला.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions












