तब्बल सात वर्षांनंतर पुन्हा एकदा मान्सूनने वेगवान वाटचाल केली असून निश्चित तारखेच्या बारा दिवस अगोदरच संपूर्ण देशात मान्सून पसरला आहे. आज पश्चिमी दक्षिणी वाऱ्याने निर्माण झालेली चक्रीवादळाची परिस्थिती पाहता मराठवाड्यात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. चिकलठाणा वेधशाळेचे शास्त्रज्ञ राजेश कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार या वर्षी मान्सूनला अनुकूल परिस्थिती असल्या निर्माण झाल्याने देशातील सर्व राज्य मान्सून व्यापली आहेत. साधारणतः आठ जुलै रोजी दक्षिण पश्चिम मान्सून देशभर दस्तक देतो. मात्र यावर्षी १२ दिवस अगोदरच मान्सूनने राजस्थान, हरियाणा, पंजाब सह संपूर्ण देश व्यापला आह. गेल्या २४ तासात पश्चिमी राजस्थान, पंजाब, हरियाणा, चंदीगड सह इतर राज्ये मान्सूनने व्यापली आहेत.
मराठवाड्यात जोरदार पर्जन्यवृष्टीची शक्यता !दरम्यान पश्चिमी राजस्थानातून चक्रीवादळाचे स्वरूप घेतलेले वारे वेगाने वाहत असल्याने मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, बीड या जिल्ह्यात आज जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. विजेच्या कडकडाटासह वाऱ्याचा वेगही अधिक राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. येत्या २४ तासात मध्य प्रदेश, मराठवाडा तसेच विदर्भात जोरदार पर्जन्यवृष्टी होईल, असे भाकीतही हवामान खात्याने वर्तवले आहे.